1 / 7महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेली कल्याणची चुलबुली शिवाली परब (Shivali Parab). शिवालीच्या कॉमेडीचे तर प्रेक्षक चाहते आहेतच. तसंच तिच्या क्युट लूक्सवरही लोक फिदा आहेत.2 / 7शिवालीने महाराष्ट्राची हास्यजत्रा मधून खूप यश मिळवलं. एवढ्या कमी वयात तिने इतकी लोकप्रियता मिळवली. हास्यजत्रेशिवाय ती काही म्युझिक अल्बम्समध्येही झळकली.3 / 7नुकतंच शिवालीने तिच्या आईवडिलांना अभिमान वाटेल असं काम केलं आहे. तिने आईवडिलांसाठी कल्याणमध्ये हक्काचं नवीन घर घेतलंय तेही स्वकमाईतून. स्वत:चं हक्काचं घर असणं हे माझं नाही तर आईवडिलांचं स्वप्न मी पूर्ण केल्याचं तिने म्हटलं आहे.4 / 7गृहप्रवेशाच्या वेळी शिवालीने आपल्या नवीन घरात खास फोटोशूट केलं. नव्या घराचा आणि आईवडिलांना गर्व वाटेल अशी कामगिरी केल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. 'खुशी' असंच कॅप्शन तिने या फोटोंना दिलंय.5 / 7हिरवी साडी, नाकात नथ, हातात पाटल्या, कपाळी चंद्रकोर, गळ्यात मोत्यांचा हार आणि मोत्याचे कानातले अशा सुंदर पारंपरिक लूकमध्ये ती गृप्रवेशासाठी तयार झाली. 6 / 7अखेर शिवाली तिच्या आईवडिलांना घेऊन चाळीतून 2 बीएचके घरात शिफ्ट झाली आहे. शिवालीच्या या कामगिरीवर तिच्या सहकलाकरांनीही तिला शुभेच्छा दिल्यात. 7 / 7अखेर शिवाली तिच्या आईवडिलांना घेऊन चाळीतून 2 बीएचके घरात शिफ्ट झाली आहे. शिवालीच्या या कामगिरीवर तिच्या सहकलाकरांनीही तिला शुभेच्छा दिल्यात.