Join us

कुठे गेला 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' स्टार ओंकार भोजने? धरलीये गावाकडची वाट, करतोय 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:14 IST

1 / 9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या मनात घर केलेला कॉमेडी शो.
2 / 9
या शोमुळेच ओंकार भोजनेला प्रसिद्धी मिळाली. कॉमेडीचं अचूक टायमिंग साधत आणि टॅलेंटच्या जोरावर ओंकारने त्याची जागा निर्माण केली.
3 / 9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेला ओंकार भोजने सध्या मात्र कुठेच दिसत नाहीये. नक्की काय करतोय ओंकार चला जाणून घेऊया.
4 / 9
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून एक्झिट घेतल्यानंतर ओंकार हसताय ना हसायलाच पाहिजे या शोमध्ये दिसला होता. पण, सध्या तो अभिनय सोडून वेगळंच काम करत आहे.
5 / 9
ओंकारची पावलं त्याची गावी चिपळूणकडे वळली आहेत. त्याची चिपळूणमध्ये स्वच्छतादूत म्हणून नेमणूक झाली आहे.
6 / 9
सध्या ओंकारने त्याच्या गावी स्वच्छता आणि प्लास्टिक निर्मूलनाचं जनजागृतीचं काम हाती घेतलं आहे.
7 / 9
प्लास्टिक आणि कचरा संकलन मोहिमेचा शुभारंभ ओंकारच्या हस्ते करण्यात आला. त्याने स्वत: घंटागाडीतून फिरुन कचरा जमा करत स्वच्छतेचा संदेश दिला.
8 / 9
'माझ्या शहरासाठी माझी स्वच्छतादूत म्हणून नेमणूक झाली म्हणून नव्हे, तर नागरिक म्हणूनही पर्यावरण जपण्याची माझी जबाबदारी आहे'.
9 / 9
'गावाबाहेर असलेल्यांनीसुद्धा या मोहिमेत सहभागी होणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यासाठी कोणीतरी एक ब्रँड अँबेसेडर असू शकत नाही असं मला वाटतं', असं ओंकार म्हणाला.
टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारमराठी अभिनेता