लोकनाट्य गाजवणारे रंगकर्मी राजा मयेकरांच्या नातवाला पाहिलंत का? मराठी मनोरंजन विश्वातच आहे सक्रिय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 15:57 IST
1 / 8 लोकनाट्याचा राजा असा खिताब मिळवणारे रंगकर्मी राजा मयेकर यांचं नाव मराठी कलाविश्वात मोठ्या अदबीनं घेतलं जातं.2 / 8मराठी नाटक, चित्रपट, मालिका तसेच आकाशवाणी या चारही क्षेत्रांमध्ये त्यांनी काम करुन त्यांनी आपला ठसा उमटवला. 3 / 8 दशावतारी नाटकापांसून राजा मयेकर यांनी आपला अभिनय प्रवास सुरु केला होता. मात्र, वयाच्या ९२ वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. 4 / 8जवळपास ६० वर्षे त्यांनी अभिनय क्षेत्र गाजवलं आहे. त्यांचा तोच अभिनयाचा वारसा त्यांच्या नातू पुढे नेत आहे, असे म्हणायला हरकत नाही.5 / 8 परंतु, तुम्हाला माहितीये का राजा मयेकर यांचा नातू सुद्धा मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. त्याचं नाव ओंकार राऊत. 6 / 8 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'या शोमधून ओंकार राऊन नावारुपाला आला. या कार्यक्रमाने त्याला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली.7 / 8 ओंकारने आजवर अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करुन प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाची छाप उमटवली. 'टाईमपास' या सिनेमातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं.8 / 8 त्यानंतर 'फ्रेशर्स', 'फुलपाखरू', 'काळे धंदे','टाईमपास 3', 'चिकी चिकी बुबुम बूम' यांसारख्या मालिका, सिनेमा आणि वेब सीरीजमध्ये काम केलं आहे. अलिकडेच तो नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'इन्स्पेक्टर झेंडे' या हिंदी सिनेमात पाहायला मिळाला.