1 / 7प्राजक्ता माळी ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. प्राजक्ता माळी सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोचं सूत्रसंचालन करत आहे2 / 7प्राजक्ता माळीला आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंच आहे. पण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून प्राजक्ता घराघरात खऱ्या अर्थाने लोकप्रिय झाली3 / 7प्राजक्ता माळीने एका मुलाखतीत 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील कोणते अभिनेते त्रास देतात, याचा खुलासा केलाय. प्राजक्ताने गंमतीशीर खुलासा करुन दोन अभिनेत्यांचं नाव घेतलं4 / 7प्राजक्ता माळी म्हणाली, 'हे सांगितलं पाहिजे का मी! पृथ्वीक प्रताप आणि ओंकार राउत.. दोघे इतकं फ्लर्ट करतात ना. मी त्यांना म्हणते नका ना करु!' 5 / 7प्राजक्ता पुढे म्हणाली, 'मला त्यांच्या फ्लर्टिंगवर कसं रिअॅक्ट व्हावं कळत नाही. मग ते मला म्हणतात, तू आम्हाला हो म्हण. मी त्यांना नंतर सांगते, 'कसं रे मित्रांनो! माझे मित्र राहा ना छान.' अर्थात हा प्रेमाचा छळ आहे', असा खुलासा प्राजक्ताने केला.6 / 7प्राजक्ताची हास्यजत्रामधील सर्व कलाकारांशी चांगली मैत्री आहे. हास्यजत्रेत अनेकदा स्कीटमध्येही ओंकार आणि पृथ्वीक प्राजक्ताशी फ्लर्ट करताना दिसतात.7 / 7प्राजक्ताच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर २०२४ मध्ये तिची भूमिका असलेला 'फुलवंती' सिनेमा चांगलाच गाजला. त्यानंतर प्राजक्ता 'चिकी चिकी बुबुम बुम' या सिनेमात दिसली. सध्या प्राजक्ता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चं सूत्रसंचालन करत आहे.