1 / 7 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा सर्वांचा लाडका शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्रीने सोशल मीडियावर लग्न करणार असल्याची गुड न्यूज शेअर करुन सर्वांना सुखद धक्का दिलाय2 / 7ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे ईशा डे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' गाजवणारी ईशा लवकरच लग्न करणार आहे3 / 7ईशाने ग्रहमख विधीचे फोटो शेअर करुन सर्व चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. ईशाची मैत्रीण आणि कुटुंबियांनी अभिनेत्रीचे हे लग्नाआधीचे विधी केले4 / 7ईशा या फोटोत खूप आनंदात दिसत आहे. ईशाने मोरपिशी रंगाची लाल पदर असलेली खास साडी परिधान करुन कॅमेरात पोझ दिली आहे.5 / 7ईशा डेचा होणारा नवरा कोण आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. तरीही ईशाने अचानक ही बातमी दिल्याने चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे6 / 7ईशा डे ही सर्वांची आवडती अभिनेत्री. गेली अनेक वर्ष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून ईशा चाहत्यांचं मनोरंजन करत आहे.7 / 7 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शिवाय ईशाने गुलकंद या मराठी सिनेमात काम करुन सर्वांंचं मन जिंकलं. ईशाच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल सर्वांना उत्सुकता होईल. आगामी दिवसात त्याचा उलगडा होईलच