By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:54 IST
1 / 7'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय शो. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील अनेक कलाकार प्रेक्षकांचे लाडके आहेत. मधल्या काळात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून ब्रेक घेतलेला असाच एक अभिनेता पुन्हा हास्यजत्रेत कमबॅक करतोय. 2 / 7हा अभिनेता म्हणजे निमिष कुलकर्णी. निमिष कुलकर्णी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील लाडक्या कलाकारांपैकी एक होता. आता अनेक महिन्यांच्या गॅपनंतर निमिष 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये दणक्यात कमबॅक करतोय. 3 / 7आज म्हणजे मंगळवारी १४ एप्रिलला निमिषचं स्कीट बघायला मिळणार आहे. निमिष, समीर चौघुले आणि शिवाली परब या तिघांचं शिवाली हे खरंय? हे गाजलेलं स्कीट आज 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर सादर होणार आहे.4 / 7याशिवाय निमिष कुलकर्णीचं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या मंचावर एक नव्हे तर सलग दोन स्कीट देणार आहेत. सोनी मराठीने सोशल मीडियावर याविषयीची प्रोमो पोस्ट केला असून ही माहिती सर्वांना दिली.5 / 7निमिष कुलकर्णीला पुन्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या रंगमंचावर पाहताच सर्वांना आनंद झाला आहे. सर्वांनी निमिषचं कौतुक केलं असून त्याला पुन्हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'त पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.6 / 7अभिनय आणि कॉमेडीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा निमिष कुलकर्णीने डिसेंबर २०२५ मध्ये लग्न करत त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. निमिषच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले.7 / 7निमिषने कोमल भास्कर हिच्यासोबत सप्तपदी घेत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. निमिषची पत्नी कोमलचंही कलाविश्वाशी खास कनेक्शन आहे. कोमल मराठी सिनेसृष्टीत सक्रिय आहे. तिने मालिकांची क्रिएटिव्ह हेड म्हणून काम पाहते.