PHOTOS : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' मधील गौतम विरानी आठवतोय? आता इतका बदलला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 15:22 IST
1 / 10Sumeet Sachdev : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या लोकप्रिय मालिकेतील गोमजी अर्थात गौतम विरानी तुम्हाला आठवत असेलच. आता त्याला ओळखणंही कठीण झालंय.2 / 10गोमजीची भूमिका अभिनेता सुमित सचदेवने साकारली होती. या भूमिकेनं त्याला एक वेगळी ओळख दिली.मात्र २०१८ पासून छोट्या पडद्यावरून तो जणू गायब झाला होता.3 / 10आता तब्बल पाच वर्षांनी तो छोट्या पडद्यावर परतला आहे. पण आताश: त्याचा लुक इतका बदललाये की, त्याला तुम्ही ओळखूही शकणार नाही.4 / 10चासनी या मालिकेतून त्याने छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. या मालिकेसाठी सुमितने तब्बल १५ किलो वजन कमी केलं.5 / 10सुमितने नव्या लुकमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे हे फोटो पाहून हाच तो गोमजी यावर चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये.6 / 10त्याने हेअर स्टाइल देखील बदलली आहे. केस वाढवले असून ते ब्लीच केले आहेत. तासन् तास जिममध्ये घाम गाळला.7 / 10चासनी या मालिकेत सुमित निगेटिव्ह भूमिकेत आहे. सुमेर बब्बर नावाची भूमिका तो साकारत आहे. ये है मोहब्बते या मालिकेत सुमित शेवटचा दिसला होता. त्यात त्यानं अभिमन्यु राघव उर्फ मणि ही भूमिका साकारली होती. 8 / 10क्यों की सास भी कभी बहू थी, क्या हादसा क्या हकीकत, ख्याहिश, बंदिनी, प्यार का बंधन अशा अनेक मालिकेत त्याने काम केलंय.9 / 10लॉकडाऊनदरम्यान सगळं काही ठप्प झालं होतं. यावेळी त्याने आपलं युट्यूब चॅनल सुरू केलं होतं. बारीश बन जाना या म्युझिक व्हिडीओचं दिग्दर्शनही केलं होतं.10 / 10सुमित सचदेव हा दिल्लीचा आहे. खास म्हणजे, तो स्मृती इराणींचा क्लासमेट होता. क्यों की सांस भी कभी बहू थी मालिकेत स्मृती इराणींनी त्याच्या आईची भूमिका साकारली होती.