Join us

कुठे हरवले 'खिचडी'चे कलाकार? पाहा २१ वर्षांनंतर त्यांच्यात झालेला बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 15:47 IST

1 / 11
२००० सालात सास-बहू मालिकांना विशेष पसंती मिळाली होती. त्यातलीच एक मालिका म्हणजे 'खिचडी'. हसून हसून प्रेक्षकांना वेड लावणाऱ्या या मालिकेतील कथानक आणि कलाकार प्रचंड लोकप्रिय झाले होते. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या मालिकेत एका गुजराती कुटुंबाची कथा दाखवण्यात आली होती. विशेष म्हणजे आता ही मालिका बंद होऊन २०-२१ वर्ष झाले. त्यामुळेच या मालिकेतील कलाकार आता कसे दिसतात किंवा ते काय करतात पाहुयात.
2 / 11
प्रफुल पारेख - या मालिकेमध्ये अभिनेता राजीव मेहता याने प्रफूल ही भूमिका साकारली होती. प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण किंवा त्याचा अर्थ सांगण्याची प्रफुलची वेगळीच पद्धत होती. त्यामुळे तो विशेष लोकप्रिय झाला.
3 / 11
राजीव हा गुजराती अभिनेता असून त्याने रंगीला चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्याने एक महल सपनो का' आणि 'हम सब एक हैं' या मालिकांमध्ये काम केलं. सध्या तो गुजराती चित्रपटांमध्ये काम करत आहे.
4 / 11
हंसा पारेख- अभिनेत्री सुप्रिया पाठक यांनी हंसा पारेख ही भूमिका साकारली होती. प्रफुलची पत्नी असलेली हंसा तिच्या भोळेपणामुळे लोकप्रिय झाली.
5 / 11
या मालिकेत त्या मुख्य भूमिकेत होत्या. सुप्रिया अजूनही कलाविश्वात कार्यरत असून सध्या त्या चित्रपटांमध्ये झळकत आहेत.
6 / 11
जयश्री पारेख - पारेख कुटुंबातील सर्वात धाकटी सून म्हणजे जयश्री पारेख. ही भूमिका अभिनेत्री वंदना पाठकने साकारली होती. कमी वयात पतीचं निधन झालेल्या जयश्रीला घर सांभाळणं आणि चुगल्या लावणं विशेष आवडायचं. तिच्या याच स्वभावामुळे तिची भूमिका गाजली.
7 / 11
वंदनादेखील गुजरातची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने हम पाच, एक महल सपनों का, साथ निभाना साथिया, सावित्री देवी कॉलेज या मालिकांमध्ये काम केलं आहे.
8 / 11
तुलसीदास पारेख - या मालिकेत अनग देसाई यांनी तुलसीदास पारेख या घरातील मुख्य व्यक्तीची भूमिका साकारली आहे.
9 / 11
कायम खराब मूडमध्ये असलेल्या तुलसीदासचं जयश्रीसोबत कधीच पटायचं नाही. त्यामुळे ते लोकप्रिय झाले. या मालिकेव्यतिरिक्त त्यांनी १५० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
10 / 11
हिमांशु सेठ - या मालिकेत हिमांशू हा हंसाचा धाकटा भाऊ दाखवला आहे. ही भूमिका अभिनेता जेडी मजेठियाने साकारली असून आता त्याच्या कमालीची बदल झाला आहे.
11 / 11
त्याने 'साराभाई वर्सेज़ साराभाई', 'बा, बहू और बेबी' , 'बड़ी दूर से आये हैं' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीटिव्ही कलाकार