Join us

"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 18:50 IST

1 / 8
'स्पेशल ऑप्स २' या वेब सिरीजमध्ये दिसलेला करण टॅकर सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीदरम्यान करणने त्याच्या संघर्षांबद्दल मोकळेपणाने संवाद साधला.
2 / 8
करणने सांगितलं की, त्याचा 'एक हजारों में मेरी बहना है' हा शो प्रेक्षकांमध्ये खूप लोकप्रिय झाला होता, पण नंतर एक वेळ अशी आली की सर्वांनी शो सोडण्याचा निर्णय घेतला.
3 / 8
अभिनेत्याने त्या काळात चित्रपटांमध्ये काम करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला होता. कारण टीव्ही मालिकेच्या यशाची खात्री कमी होत चालली होती.
4 / 8
करणने शो सोडला आणि चित्रपटांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. करण जवळजवळ सात वर्षे खूप स्ट्रगल केला, या काळात तीन वर्षे घरीच होता.
5 / 8
छोटी-मोठी काम करून तो दिवस काढत होता. इन्स्टंट बॉलिवूडशी बोलताना करण म्हणाला, 'जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा मला थोडं वाईट वाटायचं.'
6 / 8
'जेव्हा तुमचा मूड चांगला नसतो तेव्हा तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी येते. छोट्या छोट्या गोष्टींचं खूप वाईट वाटतं. मी ती फेजही अनुभवली आहे.'
7 / 8
करण अनुपम खेर निर्मित 'तन्वी' चित्रपटात दिसला होता. तो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी न्यू यॉर्कला गेला होता.
8 / 8
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन