By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 14:51 IST
1 / 5दिग्दर्शक करण जोहर आणि अभिनेत्री काजोल दीर्घकाळापासून एकमाकांचे चांगले मित्र आहेत. दरम्यान, झलक दिखला जा १० च्या नव्या भागात करण जोहर काजोल बाबतचं एक गुपित उघडं करताना दिसणार आहे. 2 / 5करण जोहर झलक दिखला जा १० च्या मंचावर काजोलच्या क्रशचं नाव उघड करणार आहे. झलक दिखला जा १० चा नवा प्रोमो नुकताच रिलीज झाला आहे. त्यामध्ये काजोल आणि करण जोहर एकत्र दिसत आहेत. 3 / 5काजोल या शो मध्ये सलाम वेंकी या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचली आहे. त्यावेळी काजोल आणि करण जोहर एक खेळ खेळताना दिसत आहेत. प्रोमोमध्ये मनीष पॉल काजोलचा अजय देवगन सोडून कुठल्या बॉलीवूड स्टारवर क्रश होता, असा प्रश्न करण जोहरला विचारताना दिसत आहे. 4 / 5मनीष पॉलच्या प्रश्नानंतर करण जोहर एका पाटीवर काहीतरी लिहिताना दिसत आहे. करण जोहर ती पाटी पलटतो तेव्हा त्यावर अक्षर कुमार हे नाव लिहिलेलं दिसतं. ते नाव पाहिल्यानंतर काजोलच्या चेहऱ्यावरील हावभाव बदललेले दिसतात. त्यानंतर ती खूप हसते. 5 / 5याक्षणी मनीष पॉलसुद्धा मस्ती करण्यात मागे राहत नाही. तसेत तो सिंघमचा स्टाईलमध्ये विचारतो की, ही गोष्ट अजय सरांना माहिती झाली का? त्यावर काजोल खूप हसते.