Join us

'स्वामी समर्थ'फेम साधीभोळी चंदा खऱ्या आयुष्यात आहे प्रचंड ग्लॅमरस; मॉर्डन लूकमध्ये वेधतीये नेटकऱ्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 15:01 IST

1 / 7
छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे 'जय जय स्वामी समर्थ'. अल्पावधीत या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
2 / 7
या मालिकेतील प्रत्येक कलाकार उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मात्र, त्यातील चंदा विशेष लोकप्रिय झाली आहे.
3 / 7
स्वामींच्या सेवेत लीन असलेली चंदा तिच्या साधेपणामुळे, निस्सिम भक्तीमुळे लोकप्रिय होत आहे.
4 / 7
मात्र, मालिकेत दिसणारी साधीभोळी चंदा खऱ्या आयुष्यात प्रचंड ग्लॅमरस आहे.
5 / 7
या मालिकेत अभिनेत्री विजया बाबर हिने चंदाची भूमिका साकारली आहे.
6 / 7
जय जय स्वामी समर्थ ही विजयाची पहिलीच मालिका असून यापूर्वी तिने अनेक नाटकांमध्ये काम केलं आहे.
7 / 7
विजया सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकार