Join us  

गोविंदाची भाची Ragini Khanna आहे खूप सुंदर, कधी साडी तर कधी वेस्टर्न ड्रेसमध्ये दाखवल्यात बोल्ड अदा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 5:59 PM

1 / 6
प्रसिद्ध अभिनेत्री आणि गोविंदाची सर्वात धाकटी भाची रागिनी खन्ना हिने तिच्या अदाकारीने, कॉमेडीने आणि सुंदर अदांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या ती टीव्ही स्क्रिनपासून दूर असली तरी फॅन्समध्ये ती चर्चेचा विषय ठरलेली असते.
2 / 6
रागिनी खन्ना टेलिव्हिजनच्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. रागिनीने टीव्हीवरील जवळपास प्रत्येक चॅनेलवरील लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलेलं आहे. रागिनी सध्या ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तसेच सोशल मीडियावर नवनवे फोटो शेअर करत असते.
3 / 6
रागिनीच्या वर्कफ्रंटचा विचार केल्यास तिने २००८ मध्ये एनडीटीव्ही इमॅजिनवरील राधा की बेटियाँ कुछ कर दिखाएंगी मालिकेमधून करिअरला सुरुवात केली होती. त्यानंतर ती सोनी टीव्हीवरील भास्कर भारती आणि देख भाई देख या मालिकांमध्ये दिसली होती.
4 / 6
त्यानंतर रागिनीने २००९ मध्ये दस का दम, बिग मनी आणि २०१० मध्ये ससुराल गेंदा फूल सारख्या मालिकांमध्ये काम केलं होतं. रागिनीने याशिवाय अनेक मालिका आणि रियालिटी शोमध्येही काम केलं होतं.
5 / 6
रागिनी खन्ना हिने काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. रागिनी खन्ना हिला तिच्या अभिनयासाठी दादासाहेब फाळके आयकॉन आवॉर्ड्स २०२२ ने सन्मानित करण्यात आले आहे.
6 / 6
रागिनी खन्ना ही रील लाईफपासून रियल लाईफपर्यंत अत्यंत साधं जीवन जगणे पसंद करते. ती नेहमी सोशल मीडियावर आपल्या साधेपणामुळे फॅन्सचं लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
टॅग्स :गोविंदाटेलिव्हिजनबॉलिवूड