Join us
Daily Top 2Weekly Top 5

गौतमी पाटीलनं सांगितले भविष्यातील प्लॅन्स, म्हणाली "गावा-खेड्यातील गुणी मुला-मुलींना..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 18:32 IST

1 / 10
सबसे कातील गौतमी पाटील... लोकप्रिय नृत्यांगना गौतमी पाटीलची महाराष्ट्रात खूप क्रेझ आहे.
2 / 10
निखळ सौंदर्य, आपल्या बिनधास्त आणि कातिला डान्सने तिने अगदी कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली.
3 / 10
गौतमी गावागावात जाऊन लावणी नृत्याचे कार्यक्रम सादर करते. गौतमीला या कार्यक्रमांमधून कमालीची प्रसिद्धी मिळाली आहे.
4 / 10
नुकतंच गौतमीनं 'मटा कट्टा'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भविष्यातील तिच्या प्लॅन्सबद्दल सांगितलं.
5 / 10
'डान्सिंग क्वीन' गौतमी आता एका नव्या आणि उदात्त ध्येयाने प्रेरित झाली आहे. केवळ प्रसिद्धीच्या मागे न धावता, कलेचा वारसा जपण्यासाठी आणि ग्रामीण भागातील सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गौतमी प्रयत्न करणार आहे.
6 / 10
गौतमी म्हणाली, 'भविष्यात मला नृत्याचा क्लास सुरू करायचा आहे. नृत्य शिकणाऱ्यांसाठी मला एक व्यावसायिक मंच)तयार करायचा आहे. आयुष्यात ज्या संधी आणि जे व्यासपीठ मला मिळालं नाही, ते मला गावा-खेड्यातील गुणी मुला-मुलींना मिळवून द्यायचं आहे'.
7 / 10
गौतमीनं सांगितलं की, या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी ती स्वतःपेक्षाही उत्कृष्ट नृत्य करणाऱ्या शिक्षकांची नेमणूक करणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळेल.
8 / 10
यावेळी चित्रपटसृष्टीतील पदार्पणाबाबतही भाष्य केलं. ती म्हणाली, 'मला भविष्यात सिनेमात काम करण्याची इच्छा नक्कीच आहे. जर मला अभिनयामध्ये संधी मिळाली, तर मी नक्की प्रयत्न करेन. पण त्यासाठी मी घाई करणार नाही, तर पूर्ण तयारीनिशीच या क्षेत्रात उत्तरेन'.
9 / 10
आपल्या स्वप्नांबद्दल बोलताना गौतमी म्हणाली, 'माझं ध्येय केवळ प्रसिद्धी मिळवणं हे कधीच नव्हतं. मला कला टिकवायची आहे आणि तिला समाजात योग्य सन्मान मिळवून द्यायचा आहे. मराठी संस्कृतीचं सौंदर्य सातासमुद्रापार जगभर पोहोचवणं, हेच माझं स्वप्न आहे'.
10 / 10
दरम्यान, अलिकडेच गौतमी 'रुपेरी वाळूत' या रीमिक्स गाण्यामध्ये 'इंडियन आयडॉल' फेम सुप्रसिद्ध पार्श्वगायक अभिजीत सावंतसोबत झळकली.
टॅग्स :गौतमी पाटीलटेलिव्हिजन