Join us
Daily Top 2Weekly Top 5

को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 13:37 IST

1 / 11
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठीने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. मात्र एक वेळ अशी होती जेव्हा अभिनेत्री को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली होती. नातं वाचवण्यासाठी तिने काळ्या जादूवर विश्वास ठेवला होता.
2 / 11
टीव्हीच्या लोकप्रिय जोडप्यांमध्ये दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा ​​यांच्या नावाचाही समावेश होता. दोघांनी ‘बनू मैं तेरी दुल्हन’ मध्ये एकत्र काम केलं होतं. या शोमध्ये काम करत असतानाच दोघांमध्ये जवळीक वाढली आणि एकमेकांना डेट करायला सुरुवात झाली.
3 / 11
हा शो २००९ मध्ये बंद झाला. दिव्यांका त्रिपाठी आणि शरद मल्होत्रा ​​यांनी आपलं नातं अनेक वर्षे जगापासून लपवून ठेवलं होतं. दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र स्पॉट झाले होते.
4 / 11
७ वर्षे डेट केल्यानंतर, शरद मल्होत्रा ​​आणि दिव्यांका त्रिपाठी यांनी २०१५ मध्ये त्यांचं नातं जगजाहीर केलं, परंतु त्यांनी नातं ऑफिशियल केल्यानंतरच त्यांचं ब्रेकअप झालं.
5 / 11
राजीव खंडेलवालच्या टॉक शो 'जस बात'मध्ये आपल्या ब्रेकअपबद्दल बोलताना दिव्यांका त्रिपाठी म्हणाली होती की, ती प्रेमात सर्व मर्यादा ओलांडते. शरद मल्होत्रासोबतच्या नात्यातही तिने असंच केलं होतें
6 / 11
अभिनेत्रीने सांगितले होतं की, ती खूप व्यस्त होती, पण तरीही ती शरद मल्होत्रा याच्या कुटुंबासाठी वेळ काढत असे. अभिनेत्यासाठी त्याचं कुटुंब किती महत्त्वाचं आहे हे तिला माहीत होतं.
7 / 11
दिव्यांकाच्या म्हणण्यानुसार, शरदसाठी वेळ काढण्यासाठी ती झोपेशी तडजोड करायची. प्रेमात ती सर्व काही विसरली होती, पण तिने दिलेल्या प्रेमाच्या बदल्यात तिला काहीच मिळालं नाही.
8 / 11
दिव्यांका त्रिपाठीने टॉक शोमध्ये खुलासा केला होता की ती 'महाराणा प्रताप' फेम अभिनेत्याच्या प्रेमात इतकी आंधळी झाली होती की तिने त्यांचं नातं वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. अभिनेत्रीने अंधश्रद्धा आणि काळ्या जादूचा देखील आधार घेतला होता.
9 / 11
शरद मल्होत्रासोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिव्यांका त्रिपाठीने २०१६ मध्ये 'ये है मोहब्बतें'चा को-स्टार विवेक दहियासोबत लग्न केलं. २०१९ मध्ये शरदनेही रिपसी भाटियाशी लग्न केलं आहे.
10 / 11
दिव्यांका त्रिपाठीचे असंख्य चाहते आहेत. ती फारस सुंदर दिसते. चाहते तिच्या अदांवर घायाळ होतात. अभिनेत्री सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते.
11 / 11
टॅग्स :दिव्यांका त्रिपाठीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन