Join us

लग्नानंतर ४ वर्षांतच घेतला घटस्फोट, २ वर्षांची मुलगी होती पदरात; आता Ex नवऱ्यालाच डेट करतेय अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 12:05 IST

1 / 8
सिनेसृष्टीतील घटस्फोट हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. एका टीव्ही अभिनेत्रीनेही लग्नानंतर ४ वर्षांतच घटस्फोट घेतला होता.
2 / 8
मात्र आता अभिनेत्री आपल्या ex नवऱ्यालाच डेट करत आहे. ही अभिनेत्री म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून चारू असोपा आहे.
3 / 8
चारू असोपा आणि राजीव सेन पुन्हा एकत्र आले आहेत. गणपतीतही ते एकत्र दिसले होते.
4 / 8
त्यानंतर आता लेकीसह ते बँकॉकमध्ये फॅमिली व्हॅकेशन एन्जॉय करत आहेत. विशेष म्हणजे चारू असोपा आणि राजीव सेन डेट नाइटला गेले होते.
5 / 8
याचे फोटो राजीव सेनने शेअर केले आहेत. घटस्फोटानंतर ते पुन्हा एकत्र आल्याने चर्चा रंगू लागल्या आहेत. तर नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
6 / 8
चारू असोपा आणि राजीव सेन यांनी २०१९ मध्ये लग्नगाठ बांधली होती. लग्नांतर दोन वर्षांनी चारू असोपाने त्यांच्या लेकीला जन्म दिला.
7 / 8
पण, त्यानंतर त्यांच्यात खटके उडू लागले होते. त्यामुळे २०२३ मध्ये घटस्फोट घेत ते वेगळे झाले होते. चारू असोपा तिच्या लेकीसह वेगळी राहत होती.
8 / 8
घटस्फोटानंतर चारू असोपाने राजीव सेनवर अनेक गंभीर आरोप केले होते. मात्र आता पुन्हा ते एकत्र आल्याने या दोघांचं नक्की काय सुरू आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोट