बिग बॉस गाजवणाऱ्या 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाणचं शिक्षण किती माहितीये?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 17:11 IST
1 / 7यंदाच्या बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक सदस्य आपल्या दमदार खेळीने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. 2 / 7बहुचर्चित बिग बॉसच्या पाचव्या पर्वामध्ये कीर्तनकार ते सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर यांची वर्णी लागली.3 / 7या नव्या पर्वात रिलस्टार 'गुलीगत धोका' फेम सूरज चव्हाणदेखील सहभागी झाला आहे. टिकटॉकपासून सुरू झालेला त्याचा प्रवास बिग बॉसपर्यंत आला आहे. 4 / 7बारामतीच्या या पठ्ठ्याचे इन्स्टाग्राम व्हिडीओ चांगलेच चर्चेत असतात. पण, बिग बॉसचं घर गाजवणाऱ्या सूरजचं शिक्षण किती आहे तुम्हाला माहितीये का? 5 / 7मीडिया रिपोर्टनुसार, अगदी बालपणीच सूरज आई-वडिलांपासून पोरका झाला. त्यानंतर त्याचा सांभाळ बहिणींनी केला.6 / 7आपल्या मेहनतीच्या जोरावर सूरजने हा पल्ला गाठला आहे. 7 / 7अत्यंत गरीबीत दिवस काढून सूरजने जेमतेम आठवीपर्यंतच शिक्षण घेतल्याचं सांगण्यात येतं. परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याने मोलमजुरी करत दिवस काढले. सूरजचा इथपर्यंतचा प्रवास अनेकांना प्रेरणा देणारा आहे.