By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 11:32 IST
1 / 7शिव ठाकरे हा टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय चेहरा आहे. 'बिग बॉस मराठी', 'खतरों के खिलाडी' यांसारख्या रिअॅलिटी शोमधून तो घराघरात पोहोचला. 2 / 7आपला साधेपणा, मनमिळाऊ स्वभावामुळे त्याने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. अलिकडेच तो चल भावा सिटीत या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 3 / 7दरम्यान, शिव ठाकरे सोशल मीडियावर कमालीचा सक्रिय असतो. त्यामाध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो. 4 / 7सध्या शिव हा त्याच्या कुटुंबीयांबरोबर दुबईत सफरनामा करताना दिसतो आहे. आपली आणि आई-वडिलांसोबत तो क्वालिटी टाईम स्पेंड करतो आहे. 5 / 7या फोटोंमध्ये शिवने लाडक्या आजीला उचलून घेत खास फोटो क्लिक केले आहे. या फोटोंमधून चाहत्यांनी आजी आणि नातवामध्ये किती सुंदर बॉण्डिंग आहे हे दिसून येतं. 6 / 7'विथ माय सनशाईन, दुबई डेसर्ट..!' असं कॅप्शन त्याने या फोंटाना दिलं आहे. 7 / 7शिव ठाकरेचे हे फोटो पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.