Join us

'बिग बॉस मराठी' फेम जान्हवी किल्लेकरचं हळदी-कुंकू! वाण म्हणून काय दिलं? अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2025 10:30 IST

1 / 9
मालिकांमध्ये खलनायिकेची भूमिका साकारून प्रसिद्धीझोतात आलेल्या जान्हवी किल्लेकरला बिग बॉस मराठीमुळे लोकप्रियता मिळाली.
2 / 9
जान्हवीने नुकतंच तिच्या घरी हळदी-कुंकूचा कार्यक्रम ठेवला होता. याचे फोटो तिने शेअर केले आहेत.
3 / 9
पारंपरिक पद्धतीने जान्हवीने घरी तिच्या महिला नातेवाईक आणि मैत्रिणींना बोलावून हळदी-कुंकू साजरा केला.
4 / 9
महिलांना हळदी-कुंकू लावून जान्हवीने त्यांना फूल देऊन जान्हवीने वाण देत त्यांचे आशीर्वाद घेतले.
5 / 9
हळदी-कुंकूचं वाण म्हणून जान्हवीने खास गोष्ट दिली. तिने वाण म्हणून तांब्याचं भांडं दिलं आहे.
6 / 9
जान्हवीने हळदी-कुंकूसाठी हिरव्या रंगाची साडी नेसली होती. जान्हवीच्या या फोटोंवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.
7 / 9
'अभिनेत्री असूनसुद्धा सण किती छान साजरे करता', मराठी फिल्म इंडस्ट्री मधील एक अग्रगण्य अभिनेत्री भारतीय संस्कृती जपणारी लाडकी ताई जान्हवी दिदी' अशा कमेंट केल्या आहेत.
8 / 9
'मराठी संस्कृती जपत आहात हे पाहून छान वाटलं', असंही एकाने म्हटलं आहे.
9 / 9
दरम्यान, जान्हवी अबोली या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये ती दीपशिखा भोसले ही पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका साकारताना दिसणार आहे.
टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार