Join us

मुलाच्या जन्मानंतर अभिनेत्रीच्या मेंदूत झालेल्या रक्ताच्या गाठी, म्हणाली- "मला वेड्याचे झटके यायचे आणि..."

By कोमल खांबे | Updated: March 6, 2025 15:48 IST

1 / 11
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीमुळे प्रसिद्धीझोतात आली. जान्हवीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला आहे.
2 / 11
लेकाच्या जन्मानंतर डोक्यात रक्ताच्या गाठी झाल्याचा खुलासा अभिनेत्रीने जयंती वाघधरेला दिलेल्या मुलाखतीत केला.
3 / 11
जान्हवी म्हणाली, 'ईशानच्या जन्मानंतर दीड महिन्यांनी किचनमध्ये काम करत असताना माझं अर्ध शरीर अचानक उडायला लागलं'.
4 / 11
'मला कळत नव्हतं की काय होतेय. डोक्यात खूप मुंग्या आल्या आणि मी बेशुद्ध झाले. त्यानंतर १० मिनिटांनी मला जाग आली तेव्हा घरातली सगळी माणसं आजूबाजूला उभी होती'.
5 / 11
'मला शुद्ध आली आणि पुन्हा मुंग्या सुरू झाल्या. मी सगळ्यांना म्हणत होते की मला वाचवा. मला असं वाटत होतं की मी वाचणार नाही. त्यानंतर मी पुन्हा बेशुद्ध झाले'.
6 / 11
'त्यानंतर मी सहा दिवसांनी शुद्धीवर आले. तेव्हा मी आयसीयूमध्ये होते. शुद्धीवर आल्यानंतर मला एकच प्रश्न होता की माझं लहान बाळ काय करतंय. तेव्हा मला त्याला बघताही आलं नाही'.
7 / 11
'रिपोर्टमध्ये असं कळलं की मेंदूत रक्ताच्या गाठी झाल्या आहेत. त्यानंतर जेव्हा उपचार सुरू होते त्याचा परिणाम थेट मेंदूवर होत होता'.
8 / 11
'त्यामुळे मला मध्ये मध्ये वेड्याचे झटकेदेखील यायचे. मी वेड्यासारखे मध्येच हसत बसायचे किंवा रडत बसायचे. तेव्हापासून माझा नवराच माझ्या लेकाला सांभाळत आहे'.
9 / 11
'तेव्हा माझं वजनही ९५ किलो झालं होतं. सहा महिन्यांनी मी रिकव्हर होऊ लागले. यातून बाहेर पडायला मला ३-४ वर्ष लागली'.
10 / 11
'पण, याचा अजूनही त्रास होतो. जेव्हा मोठी स्क्रिप्ट असते तेव्हा ती लक्षात ठेवणं कठीण जातं'.
11 / 11
'याचा दुष्परिणाम म्हणजे मला ईशानचं बालपणच आठवत नाही. या गोष्टीचं मला वाईट वाटतं'.
टॅग्स :बिग बॉस मराठीटिव्ही कलाकार