Join us

मराठी बिग बॉस गाजवणाऱ्या निक्की तांबोळीचा बेधडक स्वॅग, म्हणाली- मी नियम पाळत नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 18:06 IST

1 / 9
निक्की तांबोळी हे नाव मराठी माणसाला बऱ्यापैकी परिचयाचं असेल यात वादच नाही, त्याचं कारण बिग बॉस मराठी.
2 / 9
निक्की तांबोळी ही नुकत्याच झालेल्या बिग बॉस मराठी ताज्या हंगामातील एक स्पर्धक होत. त्यातूनच ती मराठी घराघरात पोहोचली.
3 / 9
बिग बॉस मराठीमध्ये पहिल्या दिवसापासूनच निक्की ही बिनधास्त अन् बेधडक मुलगी अशीच ओळख झाली होती.
4 / 9
आपली मतं सडेतोड मांडणारी, वेगप्रसंगी स्पष्टपणे एखाद्या स्पर्धकाची बाजू घेणारी पण काहीशी उद्धट असे मराठी चाहते तिचं वर्णन करतात.
5 / 9
निक्की बिग बॉस मराठीचा हंगाम जिंकू शकली नाही. प्रेक्षकांची मतं तिला कमी मिळाली असं यामागचं कारण सांगितलं गेलं.
6 / 9
खेळाचे नियम असतात आणि ते पाळायला हवेत अशी सर्वसाधारण मान्यता असते. पण निक्कीने बरेचवेळा नियमांचा भंग केला त्याचाच तिला फटका बसला.
7 / 9
बिग बॉस मराठी संपले असले तरीही निक्की आपल्या मतावर अजूनही ठाम दिसतेय. तिने आपल्या ताज्या फोटोशूटमध्ये खास संदेश दिलाय.
8 / 9
हॉट अन् रिव्हिलिंग फोटोशूट करत निक्कीने कॅप्शन लिहिले आहे- मी नियमांचे पालन करत नाही, मी स्वत:चे नियम बनवते.
9 / 9
निक्कीच्या ताज्या फोटोशूटवर चाहत्यांनी लाईक्स सोबतच वेगवेगळ्या कमेंट्सदेखील केल्या आहेत. ( सर्व फोटो- Nikki Tamboli Instagram )
टॅग्स :बिग बॉस मराठीव्हायरल फोटोज्इन्स्टाग्राममराठी