1 / 7काल 'बिग बॉस मराठी ६' मध्ये एक नव्हे, दोन नव्हे तर तीन वाईल्ड कार्ड स्पर्धकांची एन्ट्री झाली. या वाईल्ड कार्ड स्पर्धकांंमध्ये चर्चेत ठरला तो म्हणजे संकेत पाठक.2 / 7संकेत पाठकने घरात आल्याआल्याच त्याच्या हुशारीने रितेशभाऊचं मन जिंकलं. संकेतने राखीसंदर्भात जे उत्तर दिलं त्यामुळे रितेशने त्याला मिठीच मारली. संकेतची बायकोही मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.3 / 7संकेतच्या बायकोचं नाव आहे सुपर्णा श्याम. सुपर्णा गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजन विश्वात कार्यरत आहे. सुपर्णा आणि संकेतची जोडी सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.4 / 7संकेत आणि सुपर्णा या दोघांनी दुहेरी या मालिकेत एकत्र काम केलं होतं. मालिकेच्या सेटवरच त्यांच्यातलं प्रेम जुळलं आणि पुढे दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.5 / 7२०२२ मध्ये संकेत आणि सुपर्णा यांनी एकमेकांशी लग्न केलं. या दोघांचे अलीकडच्या काळातील रिल सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.6 / 7सुपर्णाने छत्रीवाली, बंध रेशमाचे या मालिकांमध्ये काम केलं आहे. याशिवाय डोन्ट वरी हो जाएगा सारख्या नाटकांतही सुपर्णाने काम केलं आहे 7 / 7सुपर्णा काही महिन्यांपूर्वी हसताय ना, हसायलाच पाहिजे या शोमध्ये झळकली होती. विशेष म्हणजे या शोनिमित्ताने सुपर्णा 'बिग बॉस मराठी ५'मध्ये पाहुणी म्हणून गेली होती. आता सुपर्णाचा पती संकेत पाठक 'बिग बॉस मराठी ६' कसं गाजवणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे.