'स्वत:ची ओळख पुसण्याचं काम'; बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यामुळे शिवलीलाचे फॉलोअर्स नाराज
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 11:21 IST
1 / 7छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'बिग बॉस मराठी'चं तिसरं पर्व नुकतंच सुरु झालं आहे. यंदाच्या पर्वात अनेक सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून सहभागी झाले आहेत.2 / 7'बिग बॉस मराठी ३'मध्ये प्रसिद्ध किर्तनकार शिवलीला पाटीलदेखील सहभागी झाली आहे.3 / 7शिवलीला 'बिग बॉस मराठी ३' मध्ये सहभागी झाल्यापासून सोशल मीडियावर तिचीच चर्चा रंगू लागली आहे.4 / 7स्टेजवर उभं राहून हजारो लोकांच्या समोर किर्तन करणाऱ्या शिवलीला हिला बिग बॉसच्या घरात टास्क खेळताना पाहून तिचे समर्थक नाराज झाले आहेत. त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.5 / 7अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत तिला ट्रोल केलं आहे. 'शिवलीला ताई तुम्हाला बिग बॉसच्या घरात जाण्याची गरजच नव्हती', असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, 'ताई तुमचा निर्णय चुकीचा ठरेल', 'समाजाला तुमची गरज आहे, बिग बॉसला नाही','स्वत:ची ओळख पुसण्याचं काम करेल', अशा असंख्य कमेंट करत नेटकऱ्यांनी शिवलीला हिला ट्रोल केलं आहे.6 / 7शिवलीला मूळ सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील आहे. शिवलीलाचे वडीलदेखील किर्तनकार आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी किर्तन करु लागलेल्या शिवलीला आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात समाजप्रबोधन करत आहे.7 / 7शिवलीलाने आतापर्यंत एक हजाराहून जास्त किर्तनं केली आहेत.