1 / 11बिग बॉस १७ मध्ये दिसलेल्या सोनिया बन्सलने तिच्या करिअरबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. तिने एंटरटेनमेंट इंडस्ट्री सोडली आहे.2 / 11सोनियाने शोबिझपासू दूर जाण्याची घोषणा केली आहे. तिने आता आध्यात्मिक मार्ग निवडल्याचं सांगितलं आहे.3 / 11ईटाइम्सशी झालेल्या संभाषणात सोनियांनी तिच्या प्रायोरिटीबद्दल सांगितलं. स्वतःचा शोध, शांती आणि उद्देश यावर अधिक लक्ष केंद्रित करणार असल्याचं तिने म्हटलं आहे.4 / 11आपल्या मोठ्या निर्णयाबद्दल बोलताना सोनिया म्हणाली की, 'आपण इतरांसाठी सर्वकाही करण्यात व्यस्त असतो आणि स्वतःला विसरतो.'5 / 11'मला आता जाणवले आहे की, मला आता माझा उद्देशही माहित नाही. परिपूर्ण होण्याच्या, संबंधित असण्याच्या आणि अधिक कमावण्याच्या शर्यतीत मी स्वतःला गमावलं.'6 / 11'माझ्याकडे सगळं आहे... पैसा, प्रसिद्धी, लोकप्रियता. पण शांती नाही. जर आपल्याकडे शांतीच नसेल तेव्हा आपण इतक्या पैशांचे काय करणार?'7 / 11'तुमच्याकडे बाहेरचं सर्वकाही असू शकतं, पण आतून तुम्ही पोकळ आहात. ही खूप अंधार असलेली जागा आहे.'8 / 11'जीवन म्हणजे काय? हे समजून घ्यायचं आहे. या इंडस्ट्रीने मला ओळख दिली आहे, पण मला स्थिरता दिली नाही.'9 / 11'ते मला श्वास घेऊ देत नाही. आता मी दिखावा करू शकत नाही, मला वास्तवासोबत जगायचं आहे.'10 / 11'मला लाइफ कोच आणि स्पिरिच्युएल हीलर व्हायचं आहे. आयुष्य कधी बदलेल किंवा मृत्यू कधी येईल हे कोणालाही माहिती नाही असं सोनियाने म्हटलं आहे.' 11 / 11अभिनेत्रीने डुबकी, शूरवीर, येस बॉस या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. पण तिला बिग बॉस १७ मधून ओळख मिळाली.