Bigg Boss 19: खूपच ग्लॅमरस दिसते वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतलेली मालती, तिच्यापुढे तानिया मित्तल काहीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 11:43 IST
1 / 9Bigg Boss 19: 'बिग बॉस'च्या घरात मोठा धमाका झाला आहे. दुसऱ्या वाइल्ड कार्डने घरात एन्ट्री घेतली आहे. 2 / 9भारतीय क्रिकेटर दिपक चहरची बहीण मालती चहर हिने 'बिग बॉस १९'च्या घरात रविवारी वाइल्ड कार्ड एन्ट्री घेतली. 3 / 9मालतीच्या वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरातील सदस्यांसोबतच प्रेक्षकांनाही आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. 4 / 9बिग बॉसच्या घरात अमाल आणि तानियाच्या ग्रुपचा भाग होण्याची इच्छा मालतीने एन्ट्री घेण्याआधी व्यक्त केली होती. 5 / 9घरात येताच मालतीने तिचा गेम खेळायला सुरुवात केली आहे. मालतीच्या येण्याने घरातील सदस्यांपैकी तानिया मित्तल सगळ्यात जास्त अस्वस्थ झाल्याचं दिसत आहे. 6 / 9मालतीची अमालशी जवळीक तानियाला खटकल्याचं दिसतंय. त्यामुळे मालती आणि तानियामध्ये येत्या काही दिवसांत कोल्ड वॉर रंगताना दिसू शकेल. 7 / 9मालती ही एक अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि निर्माती आहे. ती मॉडेलिंगही करते. अनेक ब्युटी पेजेंट्स स्पर्धेत मालती सहभागीही झाली होती. 8 / 9मिस इंडिया अर्थ २००९ हा खिताब तिच्या नावावर आहे. तर फेमिना मिस इंडिया २०१४ ची ती उपविजेती होती. 9 / 9मालती सोशल मीडियावर सक्रिय असून तिचे १ मिलियन फॉलोवर्स आहेत. मालतीने 'बिग बॉस १९'मध्ये एन्ट्री घेतली तर घरातील समीकरणं पुन्हा बदलताना दिसतील.