"पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली, अजूनही फेडताहेत कर्ज"
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2024 15:41 IST
1 / 9बिग बॉस १८ मध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. पण या भांडणांमध्ये अभिनेत्री श्रुतिका अर्जुन तिच्या खास अंदाजात चाहत्यांना हसायला भाग पाडते.2 / 9आता शोमध्ये श्रुतिका आपल्या वडिलांनी केलेला त्याग आणि संघर्ष याची आठवण काढून भावूक होताना दिसली. ती खूप रडू रडली.3 / 9आपल्या आई-वडिलांची आठवण काढत श्रुतिका म्हणाली – 'मी माझ्या वडिलांना आणि आईला खूप मिस करत आहे. मी त्यांच्यापासून कधीच लांब राहिली नाही.'4 / 9'माझे पप्पा हे अर्जुन (श्रुतिकाचा नवरा) एवढे श्रीमंत नाहीत. पप्पांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नावर खर्च केली आणि माझ्या भावाने एकदाही विचारलं नाही की, त्याच्यासाठी काय आहे.'5 / 9श्रुतिका पुढे म्हणाली की, 'वडील अजूनही माझ्या लग्नासाठी घेतलेलं कर्ज फेडत आहेत.'6 / 9अभिनेत्री म्हणाली की, तिला तिच्या वडिलांसाठी घर घ्यायचं आहे. तिच्या आईला फिरण्याची खूप आवड आहे. म्हणूनच तिला तिच्या आईला वर्ल्ड टूरवर घेऊन जायचं आहे.7 / 9श्रुतिका शोमध्ये चांगली कामगिरी करत आहे. ती या सीझनमधील मोस्ट एन्टरटेनिंग कन्टेस्टेन्ट आहे. तिचा खेळ चाहत्यांना खूप आवडतो.8 / 9श्रुतिका अर्जुन सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीच तिचे सुंदर फोटो शेअर करत असते. तिचे असंख्य चाहते आहेत. 9 / 9