By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 14:05 IST
1 / 7'बालिका वधू' या मालिकेने एकेकाळी टीव्हीवर प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मालिकेची संकल्पना, कलाकारांचा अभिनय, प्रत्येक एपिसोडनंतर दिला जाणार संदेश यामुळे मालिका प्रेक्षकांना खूप भावली.2 / 7मालिकेत छोटी आनंदी आणि दादी सा यांचं नातं खूपच गोड होतं. अविका गौरने छोट्या आनंदीच्या भूमिका साकारली होती. तर तिचा नवरा होता जग्ग्या म्हणजेच जगदीश. अभिनेता अविनाश मुखर्जीने छोट्या जग्ग्याची भूमिका साकारली होती.3 / 7छोटी आनंदी म्हणजे अविका गौर आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. पण छोटा जग्ग्या नक्की कुठे आहे? आता तो कसा दिसतो? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.4 / 7अभिनेता अविनाश मुखर्जी (Avinash Mukherjee) 'बालिका वधू' मालिकेवेळी ११ वर्षांचा होता. आज तो एकदम हँडसम आणि स्टायलिश दिसतो. त्याच्या चार्मिंग लूकवर तरुणी घायाळ होतात.5 / 7अविनाश मुखर्जी आज २७ वर्षांचा आहे. 'बालिका वधू' नंतरही त्याने अभिनय सुरु ठेवला. 'ससुराल सिमर का २', 'संस्कार धरोहर अपनो की','इतना करो ना मुझे प्यार','पांचाली' या मालिकांमध्येही दिसला.6 / 7२०१६ ते २०२१ दरम्यान त्याने 'शक्ती: अस्तित्व के एहसास की' या मालिकेतही काम केलं. 'ससुराल सिमर का २'मध्ये त्याची राधिका मुथुकुमारसोबत केमिस्ट्री खूप लोकप्रिय झाली. 7 / 7अविनाश मुखर्जीची स्वत:ची AMM MEDIA ही डिजीटल मार्केटिंग कंपनीही आहे. अविनाश मुखर्जीचा चार्मिंग, हँडसम लूक पाहून अनेक तरुणी घायाळ झाल्या आहेत. अविनाशचे इन्स्टाग्रामवर १ मिलियन फॉलोअर्स आहेत.