Join us
Daily Top 2Weekly Top 5

Rupali Ganguly : "माझ्या मुलाचा जन्म हा चमत्कार..."; अभिनेत्रीला डॉक्टरांनी सांगितलेलं ती कधीच होणार नाही आई

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 15:22 IST

1 / 10
रुपाली गांगुली ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. दमदार अभिनयाच्या जोरावर तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
2 / 10
रुपाली सध्या 'अनुपमा' या मालिकेद्वारे लोकप्रिय झाली आहे. मात्र रुपालीचं वैयक्तिक आयुष्य थोडं संघर्षमय होतं. एका पोस्टमध्ये, अभिनेत्रीने खुलासा केला की, डॉक्टरांनी तिला ती कधीच आई होऊ शकत नाही असं सांगितलं होतं.
3 / 10
रुपालीने ६ फेब्रुवारी २०१३ रोजी अश्विन वर्मासोबत लग्न केलं आणि हे जोडपं सुखी वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. टीव्हीची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबतच रुपाली एक चांगली आई आणि पत्नी देखील आहे.
4 / 10
डायरेक्टर्स कट प्रॉडक्शनच्या इन्स्टाग्राम हँडलद्वारे शेअर केलेल्या एका नवीन व्हिडिओमध्ये रुपालीने सांगितलं की, एका टॉप गायनोकॉलोजिस्टने तिला सांगितलं होतं की ती कंसीव्ह करू शकणार नाही. ती मुलाला जन्म देऊ शकणार नाही.
5 / 10
रुपाली पुढे म्हणाली की, तिची वैष्णोदेवीवर खूप श्रद्धा आहे. म्हणून, तिने देवीची प्रार्थना करण्याचं ठरवलं आणि ती जे मागते ते तिला नेहमीच मिळतं. यावेळीही तिची इच्छा पूर्ण झाली.
6 / 10
'माझी वैष्णोदेवीवर खूप श्रद्धा आहे. मी जे काही मागते ते जिद्दीने मागते की ती मला देते हे मला माहीत नाही, ती खरोखर माझी आई आहे. मी तिच्याकडे गेले आणि म्हणाले, मला खरंच मातृत्व अनुभवायचं आहे.'
7 / 10
'मी नॅचरली कंसीव्ह केलं, मी आई होणं आणि रुद्रांश मिळणं हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा चमत्कार होता.' रुपाली गांगुली गेल्या काही वर्षांपासून तिच्या शोसह टीआरपी लिस्टमध्ये अव्वल आहे.
8 / 10
पिंकविलाच्या एका मुलाखतीत, अभिनेत्री म्हणाली होती की, कामामुळे आपल्या मुलाला वेळ देऊ शकत नाही म्हणून तिला गिल्टी वाटतं. रुपाली म्हणाली, 'प्रॉडक्शन हाऊस आमचं पर्सनल लाईफ एकोमोडेट करण्याचा प्रयत्न करतं, आम्हाला आमच्या कुटुंबांसोबत महत्त्वाचे कार्यक्रम साजरे करण्याची संधी देतं.'
9 / 10
रुपाली गांगुली सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असून ती नेहमीचे तिचे सुंदर फोटो तसेच कुटुंबीयांसोबतचे फोटो शेअर करत असते. अभिनेत्रीचे असंख्य चाहते आहेत.
10 / 10
टॅग्स :टिव्ही कलाकारटेलिव्हिजन