Join us

Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 16:19 IST

1 / 10
टीव्ही अभिनेत्री रोशनी वालिया लवकरच अजय देवगणच्या 'सन ऑफ सरदार २' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
2 / 10
मोठ्या पडद्यावर येण्याआधी रोशनी वालियाने तिच्या पर्सनल आयुष्यातील अनेक गुपितं उघड केली आहेत.
3 / 10
हॉटरफ्लायशी झालेल्या संभाषणात, अभिनेत्रीने सांगितलं की, तिच्या पालकांचा घटस्फोट झाला आहे. ते आता एकत्र राहत नाहीत.
4 / 10
आईवडील एकमेकांच्या आयुष्यातून दूर गेले आहेत. वडिलांनी आईची साथ सोडली. आता वडिलांचं स्वतःचं एक वेगळं कुटुंब आहे.
5 / 10
आईचे कौतुक करताना रोशनी म्हणाली की, तिच्या आईने तिला प्रत्येक कठीण काळात साथ दिली आहे. तिची आईच तिचं कुटुंब आहे.
6 / 10
'आमचे कोणतेही नातेवाईक नाहीत, परंतु माझे आणि माझ्या आईचे काही मित्र-मैत्रिणी आता आमचं कुटुंब बनले आहेत.'
7 / 10
'मला वाटतं की, रक्ताचं नातं आता फारसं महत्त्वाचं नाही. कधीकधी तुमचं नातं नॅचरली तयार होऊ शकतं आणि ते खूप चांगलं नातं असू शकतं.'
8 / 10
'रक्ताचं नातं असायलाच हवं असं काही नाही. कधीकधी काही लोक देवदूत बनून येतात आणि नंतर ते तुमच्या आयुष्याचा एक भाग बनतात.'
9 / 10
'आमचे आता कोणतेही नातेवाईक नाहीत. नातेवाईक आधी माझ्या आईची चेष्टा करायचे. माझी आई मुंबईत आल्यावर ते तिला टोमणे मारायचे.'
10 / 10
'नातेवाईकांना माझ्या आईला शाप दिला की, ती कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. पण आईने त्यावेळी मोठा निर्णय घेतला होता आणि आज आम्ही खूप आनंदी आहेत' असं रोशनीने म्हटलं आहे.
टॅग्स :टिव्ही कलाकारबॉलिवूड