Join us

हिना खाननंतर 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचा स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरशी लढा, आत्महत्येचा केलेला प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 13:17 IST

1 / 7
अभिनेत्री हिना खान सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे हे आपल्या सर्वांना माहितच आहे. हिना खाननंतर आणखी एक अभिनेत्री ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. ही अभिनेत्री म्हणजे रोझलिन खान.
2 / 7
रोझलिनने सोशल मीडियावर हा खुलासा केला आहे. रोझलिन स्टेज ४ कॅन्सरशी लढा देत आहे. इतकंच नव्हे रोझलिनने १९ किमो केल्या असूनही तिच्या तब्येतीत काही फरक पडत नाही
3 / 7
'जी लेने दो एक पल को', 'धमा चौकडी', 'क्राइम अलर्ट', 'सविता भाभी' यांसारख्या मालिकांमध्ये रोझलिनने अभिनय केला आहे. रोझलिनने कॅन्सरशी लढा देताना तिचा भावुक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे
4 / 7
रोझलिनच्या शरीरावरील किमो पोर्ट आता काढून टाकला आहे. त्यामुळे रोझलिनच्या खांद्यावर निशाण उमटले आहेत. मी लवकरच कमबॅक करने, असा आशावाद रोझलिनने व्यक्त केला आहे.
5 / 7
मी प्रत्येक परिस्थितीमध्ये हसणं शिकले आहे. संपूर्ण बरं होण्यासाठी थोडा वेळ लागेल. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मला रक्तस्त्राव झाला आणि परिस्थिती आणखी बिघडली, असा खुलासा रोझलिनने केला आहे.
6 / 7
रोझलिनने आतापर्यंत १९ किमो केल्या आहेत. यामुळे तिच्या शरीरावर परिणाम झाला आहे. इतकंच नव्हे तर कॅन्सरशी लढा देताना रोझलिनला नैराश्याचा सामना करावा लागला आणि यामुळे तिने आत्महत्येचा प्रयत्न केला होता
7 / 7
परंतु आता रोझलिन कॅन्सरचा खंबीरपणे सामना करत आहे. इतकंच नव्हे या कठीण काळात अभिनेत्रीचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रपरिवार तिच्यासोबत आहेत.
टॅग्स :हिना खानकर्करोगकॅन्सर जनजागृतीबॉलिवूडटेलिव्हिजन