आदिश वैद्य पुन्हा प्रेमात? रेवती लेलेसोबत ६ वर्षांनी ब्रेकअप, आता 'या' अभिनेत्रीसोबत पोस्ट केला व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 18:03 IST
1 / 9मराठी अभिनेता आदिश वैद्य सध्या चर्चेत आहे. अभिनेत्री रेवती लेलेसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तो पुन्हा प्रेमात पडल्याची चर्चा आहे. आदिश वैद्यच्या आयुष्यात आलेली 'ती' कोण?2 / 9आदिश वैद्य आणि रेवती लेले यांची जोडी मराठीत खूप चर्चेत होती. दोघंही एकमेकांच्या प्रेमात होते. सोबत फोटो, व्हिडिओही पोस्ट करायचे.3 / 9दोघांचं ६ वर्ष रिलेशनशिप होतं. अचानक २०२३ साली त्यांच्या ब्रेकअपची बातमी समोर आली आणि चाहत्यांना धक्काच बसला. काही गोष्टी घडल्या आहेत आणि त्यावर मला बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया रेवतीने दिली होती. 4 / 9दरम्यान आता आदिश वैद्यच्या आयुष्यात नवीन प्रेमाची एन्ट्री झाल्याची चर्चा आहे. काही दिवसांपासून तो सोशल मीडियावर पूजा काकुर्डेसोबत रील्स शेअर करत आहे. 5 / 9आम्ही दोघंही अनेक वर्षांपासून खूप चांगले मित्र आहोत. त्यामुळे आम्ही डेट करतोय असंच लोकांना वाटायला लागलं आहे असं मजेशीर कॅप्शन त्याने रीलला दिलं आहे.6 / 9'एक मुलगा आणि एक मुलगी कधीच मित्र होऊ शकत नाहीत' अशी मजेशीर कमेंट अभिनेता पुष्कर जोगने केली आहे. त्यामुळे आदिश आणि पूजा खरोखर एकमेकांना डेट करत आहेत का अशी चर्चा सुरु झाली आहे.7 / 9पूजा कातुर्डे देखील अभिनेत्री आहे. अहिल्याबाई होळकर, हृदयी प्रीत जागते, दुनियादारी फिल्मी स्टाईल, विठूमाऊली, श्री गुरुदेव दत्त या मालिकेत काम केलं आहे.8 / 9'सांग तू आहेस ना' या मालिकेतील तिची निगेटीव्ह भूमिका चांगली गाजली होती. 'लग्न मुबारक' सिनेमातही पूजानं काम केलं होतं. '२१७ पद्मिनी धाम' या नाटकातही ती काम करत आहे. 9 / 9आदिश वैद्य 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' मालिकेतून काही दिवसांपूर्वीच बाहेर पडला. तो मराठीसोबतच हिंदीमध्येही सक्रीय असतो.