1 / 8सामान्य असो किंवा सेलिब्रिटी प्रत्येक जण आयुष्यात कोणत्या ना कोणत्या वाईट अनुभवाला सामोरे जातो. टीव्हीवरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलेला अनुभव अंगावर काटा आणणारा आहे. 2 / 8'गुड्डन तुमसे ना हो पाएगा' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कनिका मान. 'नागिन' मालिकेतही ती दिसली. कनिकाला लहानपणी आलेला भयानक अनुभव तिच्या मनावर आघात करुन गेला.3 / 8'हॉटरफ्लाय'ला दिलेल्या मुलाखतीत कनिकाने वैयक्तिक आयुष्यावर भाष्य केलं. ती म्हणाली, 'माझं कुटुंब जुन्या विचारांचं आहे. त्यामुळे मी त्यांच्यापासून लपून अभिनयाला सुरुवात केली होती.4 / 8कनिकाने आयुष्यातला तो प्रसंग शेअर केला ज्याने तिला अक्षरश: हादरवरून सोडलं होतं. ती म्हणाली,'लहानपणी माझ्या एका चुलत भावानेच माझ्यासोबत वाईट कृत्य केलं. मला माझ्या घरातच सुरक्षित वाटत नव्हतं.'5 / 8तो माझ्यासोबत घाणेरडे चाळे करायचा आणि मला घाबरुन हे कोणाला सांगताही येत नव्हतं. माझं कुटुंब माझ्यावर निर्बंध लावेल किंवा मलाच यावरुन फटकारलं जाईल अशी मला भीती होती. 6 / 8तेव्हा मी खूप लहान होते आणि मला प्रेग्नंसीबद्दल काही माहित नव्हतं. मी प्रेग्नंट तर होणार नाही ना अशी मला भीती वाटायची. त्या नकळत्या वयातच माझ्यावर प्रचंड मोठा आघात झाला.7 / 8मी तर अबॉर्शन कसं करतात याचीही माहिती घ्यायला लागले होते. पपई खाल्ल्याने गर्भपात होतो हे मी ऐकलं होतं. म्हणून मी पपई खायला सुरुवात केली होती. त्या घटनेने माझं बालपणच हिरावलं होतं.'8 / 8कनिकाला त्या घटनेतून सावरायला खूप वेळ लागला. ती ग्लॅमर इंडस्ट्रीत काम करते हे अनेक वर्ष तिने कुटुंबापासून लपवून ठेवलं.