Join us

लग्नसोहळ्यात अविका गौरचं मंगळसूत्र हरवलं, अभिनेत्रीने होणाऱ्या नवऱ्याला दिला दोष, अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 14:29 IST

1 / 7
हा किस्सा सध्या चांगलाच गाजतोय. नुकतंच लग्न झालेली अभिनेत्री अविका गौरच्या लग्नातील मंगळसूत्र हरवल्याने मोठी गडबड झाली होती. जाणून घ्या सविस्तर
2 / 7
अभिनेत्री अविका गौरच्या लग्नसोहळ्याच्या आनंदी वातावरणात एक मजेशीर आणि काहीसा गोंधळात पाडणारा प्रसंग घडला, जेव्हा ऐन लग्नात अविकाचे मंगळसूत्र अचानक गायब झाले.
3 / 7
विवाह विधी सुरू असताना, अविका गौरच्या गळ्यातील मंगळसूत्र अचानक हरवल्याची बाब लक्षात येताच सेटवर उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.
4 / 7
मंगळसूत्र कुठे आहे? असं अविका गौरने तिचा होणारा नवरा मिलिंद चंदवानीला विचारलं. अचानक अशी घटना घडल्याने मिलिंद सुद्धा काहीसा गोंधळला
5 / 7
तुला एकच जबाबदारी दिली होती, ती सुद्धा नीट पार पाडली नाहीस? असं म्हणत अविकाने मिलिंदला दोष दिला. ऐन लग्नसोहळ्यात ही घटना घडल्याने मंगळसूत्र शोधण्यासाठी सर्वांची गडबड झाली
6 / 7
लग्नविधी सुरु असतानात ही विचित्र घडल्याने अविकाला अश्रू अनावर झाले. सर्वजण तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होते.
7 / 7
आता मंगळसूत्र खरंच गायब झालं की, कोणीतरी अविका-मिलिंदसोबत प्रँक करतंय, याचा खुलासा झाला नाहीये. अविकाआणि मिलिंद यांनी 'पती, पत्नी और पंगा' या टीव्ही शोच्या सेटवर ३० सप्टेंबर २०२५ रोजी लग्न केले.
टॅग्स :अविका गौरलग्नटिव्ही कलाकारटेलिव्हिजन