By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 11:36 IST
1 / 7टीव्ही इंडस्ट्री गाजवणाऱ्या एका अभिनेत्रीने ४१ व्या वर्षी मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वांनी अभिनेत्रीच्या निर्णयाचं कौतुक केलंय. या अभिनेत्रीचं नाव आरती सिंग. 2 / 7आरती सिंगने वयाच्या ४१ व्या वर्षी मुल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे. आरतीने हॉटरफ्लाय दिलेल्या मुलाखतीत याविषयी मनातलं सांगितलं. काय म्हणाली आरती सिंग.3 / 7''माझी माझ्या पतीसोबत पहिल्यांदा भेट झाली तेव्हा मी ३८ वर्षांची होती. मी त्याला आधीच सांगितलं होतं की, मला वाटत नाही ३९ व्या वर्षी मी गर्भधारणा करु शकेल'', असं आरती म्हणाली4 / 7आरती पुढे म्हणाली, ''मी हे बोलताच पतीने माझ्याकडे पाहिलं. तो म्हणाला या जगात इतकी मुलं आहेत त्यांच्याही डोक्यावर छप्पर हवं असतं. त्यामुळे आपण दत्तक घेऊ शकतो. इतकंच नव्हे पुढे जाऊन आपल्याला मुल झालं तरीही आपण एका बाळाला दत्तक घेऊ शकतो.''5 / 7''जर मी गर्भधारणा करु शकत असेल तर चांगली करु गोष्ट आहे. पण असं नसेल तर एखाद्या बाळाला हक्काचं घर देणं ही सुंदर गोष्ट आहे. मला कोणाला काही सिद्ध करुन दाखवायची गरज नाही'', असंही आरती स्पष्टच म्हणाली. 6 / 7आरती सिंगच्या आयुष्याची कहाणीही अशीच काहीशी आहे. तिचा जन्म ५ एप्रिल १९८५ रोजी लखनऊ येथे झाला. तिच्या जन्मानंतर अवघ्या २० दिवसांतच तिच्या आईचे निधन झाले. त्यामुळे आरतीला लखनऊमधील तिच्या आईच्या मैत्रिणीने दत्तक घेतले आणि त्यांनीच तिला मोठं केलं.7 / 7आरतीने २००७ मध्ये 'मायका' या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये काम केले. आरती ही गोविंदाची भाची आणि कृष्णा अभिषेकची सख्खी बहीण आहे.