1 / 11‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या सुप्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेतील दयाबेनची एन्ट्री होणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. गेल्या चार वर्षांपासून मालिकेतील दयाबेन हे पात्र गायब होतं. पण आता नवी दयाबेन लवकरच येतेय.2 / 11होय, दयाबेनच्या भूमिकेसाठी टीव्ही अभिनेत्री ऐश्वर्या सखूजा हिच्याशी निर्मात्यांनी संपर्क साधल्याचं कळतंय. आता ही ऐश्वर्या सखूजा कोण? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आम्ही तिच्याच बद्दल सांगणार आहोत.3 / 11ऐश्वर्या सखूजा टीव्ही अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ती एक मॉडेलही आहे. ‘सास बिना ससुराल’ या मालिकेत टोस्टीची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.4 / 11पण ‘सास बिना ससुराल’ शो सुरू असतानाच ऐश्वर्याला एका गंभीर आजाराने वेढलं. यामुळे तिला ही मालिका सोडावी लागली होती.5 / 11ऐश्वर्या सखूजाचं निकनेम चीना आहे. रिअल लाईफमध्ये ती कमालीची ग्लॅमरस व बोल्ड आहे. सोशल मीडियावर ती प्रचंड अॅक्टिव्ह आहे.6 / 11इन्स्टाग्रामवर तिचे ग्लॅमरस अवतारातील चिक्कार फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. इन्स्टावर तिचे 486K फॉलोअर्स आहेत.7 / 11ऐश्वर्याने 2010 साली ‘रिश्ता डॉट कॉम’ या मालिकेतून टीव्हीवर डेब्यू केला होता. 2011 मध्ये ‘यू आर माय जान’ या चित्रपटात ती दिसली होती.8 / 11तामिळनाडूत जन्मलेल्या ऐश्वर्याने दिल्ली युनिव्हर्सिटीतून ग्रॅज्युएशन केलं आहे. 2003 साली ऐश्वर्याने एका स्थानिक सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला होता.9 / 112006 मध्ये ती मिस इंडिया स्पर्धेतही सामील झाली होती. या स्पर्धेत तिने टॉप 10 मध्ये स्थान मिळवलं होतं. ऐश्वर्याने अॅक्टिंगसोबत झी स्पोर्ट्स व झूम चॅनलवर अँकरिंगही केली आहे. अनेक ब्रँडसाठी तिने मॉडेलिंग केलं आहे.10 / 11 मैं ना भुलूंगी, वेलकम-बाजी मेहमान नवाजी की, इतना करो ना मुझे प्यार, खिडकी, त्रिदेवियां, ये हैं चाहतें अशा अनेक मालिकांमध्ये तिने भूमिका साकारल्या.11 / 112014 मध्ये आपल्याला जस्टीन बीबरसारखा रामसे हंट सिंड्रोम हा आजार झाला होता, असा खुलासा तिने नुकताच केला होता.