Join us

एका रात्रीचे किती घेणार? चाहत्याने विचारला विचित्र प्रश्न; मुनमुन म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 08:00 IST

1 / 8
'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे मुनमुन दत्ता.
2 / 8
तारक मेहता मध्ये बबिताजी ही भूमिका साकारुन मुनमुन विशेष लोकप्रिय झाली. त्यामुळेच आज तिचे सोशल मीडियावर ७.५ मिलिअन फॉलोअर्स आहेत.
3 / 8
मुनमुन सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा चाहत्यांशी संवाद साधत असते. परंतु, अनेकदा चाहते त्यांच्या मर्यादा पार करतात. असाच काहीसा प्रकार २०१८ मध्ये घडला होता.
4 / 8
२०१८ मध्ये मुनमुनला चाहत्याच्या एका विचित्र प्रश्नाला सामोरं जावं लागलं होतं. परंतु, तिने या चाहत्याची चांगलीच कानउघडणी केली होती. सध्या हा प्रकार पुन्हा चर्चेत आला आहे.
5 / 8
एका रात्रीचे किती पैसे घेणार? असा विचित्र आणि असभ्य प्रश्न एका चाहत्याने मुनमुनला विचारला. परंतु, मुनमुनने देखील त्याला त्याच्याच भाषेत सडेतोड उत्तर दिलं.
6 / 8
'काय रे, इथे भीक मागायला का आला आहेस? लायकी विसरलास का? तुझी देवाने चेहराच असा दिलाय तर तितकचं फालतू बोलणार का? तुझ्या सारख्यावर तर कोणी थुंकणार सुद्धा नाही. समोर येऊ बोलायची हिंमत कर समजलं?', अशा तिखट शब्दात मुनमुनने या ट्रोलरला सुनावलं.
7 / 8
पुढे ती म्हणते, 'आणि हो, विचार केला तुला ब्लॉक करण्यापूर्वी तुझी लायकी तुला दाखवून द्यावी. समजलं का अडाणी. चल निघ आता, तुझा विद्रुप चेहरा घेऊन हे उद्योग दुसरीकडे कर.'
8 / 8
दरम्यान, मुनमुनने दिलेल्या उत्तराचं नेटकऱ्यांनी चांगलंच कौतुक केलं आहे. मुनमुन सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असून तिच्या जीवनातील अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
टॅग्स :मुनमुन दत्तातारक मेहता का उल्‍टा चश्‍माटेलिव्हिजनसेलिब्रिटी