By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 13:35 IST
1 / 9अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद सोबत तिने लग्न केले. कपलची रिसेप्शन पार्टी काल दिल्ली येथे पार पडली. त्यांचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.2 / 9स्वराने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता तर फहाद क्रीम रंगाच्या शेरवानीत होता. दोघांची जोडी अगदीच शोभून दिसत आहे. 3 / 9स्वरा फहादच्या रिसेप्शनला राजकीय नेत्यांचीही हजेरी होती. कॉंग्रेस नेता राहुल गांधी यांच्या एंट्रीने सर्वांचं लक्ष वेधलं. राहुल गांधी यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या. त्यांच्याशी हस्तांदोलन करतानाचे त्यांचे फोटो सध्या चर्चेचा विषय आहेत.4 / 9याशिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील रिसेप्शनमध्ये सहभागी झाले. तर भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे पॉलिट ब्युरो वृंदा खरात देखील या पार्टीत दाखल झाल्या.5 / 9स्वरा आणि फहादला शुभेच्छा देण्यासाठी खासदार आणि अभिनेत्री जया बच्चनही आल्या होत्या. पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि पिवळ्या रंगाच्या सलवार मध्ये त्या आल्या होत्या. यावेळी त्यांनी मास्क लावला होता. 6 / 9रिसेप्शन पार्टीआधी दोघांनी कव्वाली नाईटचे आयोजन केले होते. यावेळी त्यांचे आऊटफिट खूपच खास दिसत होते. दोघांनी काळ्या रंगाचे आऊटफिट घातले होते. पारंपारिक मुस्लीम लुकमध्ये दोघं तयार झाले होते.7 / 9या कव्वाली नाईटसाठी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादवही उपस्थित होते. हसतखेळत गप्पा मारतानाचे त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.8 / 9काही दिवसांपूर्वी स्वराने सोशल मीडियावर पोस्ट करत कोर्ट मॅरेज केल्याची माहिती दिली होती. स्वराने अचानक लग्न केल्याचं पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. 9 / 9स्वराचा पती फहाद हा समाजवादी पक्षाचा युवा नेता आहे. २०२० साली झालेल्या एका आंदोलनाच्या दरम्यान स्वरा व फहादची भेट झाली होती.