Join us  

एकेकाळी ५०० रुपये कमावणारा डॉ. गुलाटी आहे कोट्यधीश; सुनील ग्रोवरचं नेटवर्थ पाहून होतील डोळे पांढरे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2022 10:50 AM

1 / 10
प्रसिद्ध विनोदवीर आणि अभिनेता सुनील ग्रोवर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतो. आज सुनीलचा वाढदिवस त्यामुळे सध्या चाहत्यांमध्ये त्याच्याविषयीची चर्चा होताना दिसते.
2 / 10
डॉक्टर महशूर गुलाटी आणि गुत्थी या भूमिकांमुळे सुनील विशेष लोकप्रिय झाला.
3 / 10
विनोदाचं अचूक टायमिंग साधणाऱ्या सुनीलने कॉमेडी शो सोबतच काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे.
4 / 10
छोटा पडदा, रुपेरी पडदा आणि ओटीटीवर झळकलेला सुनील आज लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून ओळखला जातो.
5 / 10
कायम चर्चेत असणारा सुनील खऱ्या आयुष्यात प्रचंड साधा राहत असला तरीदेखील त्याची एकूण संपत्ती थक्क करणारी आहे.
6 / 10
हरियाणातील मध्यमवर्गीय कुटुंबात सुनीलचा जन्म झाला असून त्याचे वडील बँक मॅनेजर होते. सुनीलला एक मोठी बहीण आणि लहान भाऊ आहे.
7 / 10
भारत, बागी या बॉलिवूड चित्रपटांमध्ये तर तांडव या वेब सीरिजमध्ये सुनील झळकला आहे. त्यामुळे दिवसागणिक त्याचं मानधनदेखील वाढताना दिसतं.
8 / 10
५०० रुपयांपासून करिअरची सुरुवात करणारा सुनील आज एका एपिसोडसाठी १० ते १२ लाख रुपये चार्ज करतो.
9 / 10
सूत्रांच्या माहितीनुसार, सुनील एका चित्रपटासाठी ५० लाख रुपये फी घेतो. त्यामुळे त्याचं एकूण नेटवर्थ १८ कोटी रुपये आहे.
10 / 10
सुनीलचं मुंबईमध्ये आलिशान घरदेखील आहे.
टॅग्स :सुनील ग्रोव्हरसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा