Join us  

लग्नाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच सुमितला बसला धक्का; वनिता पडली 'या' गोष्टीच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 6:51 PM

1 / 8
महाराष्ट्राची हास्यजत्रा या गाजलेल्या कार्यक्रमातून नावारुपाला आलेली अभिनेत्री, विनोदवीर म्हणजे वनिता खरात.
2 / 8
उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर वनिताने प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. त्यामुळे ती कायम नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत असते.
3 / 8
वनिताने मराठी कलाविश्वासह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. त्यामुळे आज तिचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.
4 / 8
वनिता कलाविश्वासह सोशल मीडियावरही तितकीच सक्रीय आहे. त्यामुळे प्रोफेशनल लाइफसह पर्सनल आयुष्यातील गोष्टीही ती चाहत्यांसोबत शेअर करत असते.
5 / 8
वनिताने नुकतीच लग्नानंतर तिची पहिली मकरसंक्रांत साजरी केली आहे. त्यामुळे यावेळचा एक फोटोही तिने चाहत्यांसोबत शेअर केला.
6 / 8
वनिताने इन्स्टाग्रामवर तिच्या नवऱ्यासोबत सुमित लोंढेसोबतचे फोटो शेअर केले आहेत. मात्र, या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे.
7 / 8
वनिताने हलव्याचे दागिने परिधान करुन छान काळ्या रंगाची साडी नेसली होती. विशेष म्हणजे याच साडीच्या प्रेमात ती पडली आहे.
8 / 8
'माझं प्रेम जडलय ह्या साडीवर', असं कॅप्शन देत तिने सुमितसोबतचा फोटो शेअर केला आहे.
टॅग्स :वनिता खरातटेलिव्हिजनटिव्ही कलाकारमकर संक्रांती