'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम मीनाक्षी राठोडचं मॅटर्निटी फोटोशूट चर्चेत, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 11:54 IST
1 / 8‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. याच मालिकेतील देवकी अर्थात भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड हिच्याकडे सध्या गुडन्यूज आहे. 2 / 8होय, मीनाक्षी लवकरच आई होणार आहे. सध्या मीनाक्षी प्रेग्नंसी एन्जॉय करतेय. तिच्या प्रेग्नंसी फोटोशूटचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच तिने एक बोल्ड मॅटर्निटी फोटोशूट केलं आहे.3 / 8मीनाक्षीनं या फोटोंना सुंदर कॅप्शन देखील दिली आहे. ‘तुझं शरीरसौष्ठव संपलेलं नाही. तू वाघीण आहे, जिला आत्तच पट्टेरी देणगी मिळाली आहे,’ असं कॅप्शन तिने दिलंय.4 / 8मीनाक्षी मुळची जालन्याची. तिच्या अभिनयाची सुरुवात झाली ती शाळेपासून. वडील कलाप्रेमी असल्यामुळे नाटक, अभिनय, नृत्य स्पर्धांमध्ये तिला आवर्जून भाग घ्यायला सांगायचे. 5 / 8कॉलेजमध्ये असताना युथ फेस्टिव्हलमध्येही ती नियमितपणे सहभागी व्हायची. परंतु तिचा अभिनयप्रवास सुरू झाला ती मुंबईला आली तेव्हापासून.6 / 8 सर्वप्रथम ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ या प्रसिद्ध नाटकात सावित्रीबाई यांची भूमिका मिळाली. या नाटकाचे पाच वर्षांतजवळपास साडे सातशे प्रयोग झालेत. इथून तिच्या करिअरला वेग मिळाला.7 / 8जालन्यातील गंगाराम वाडी, अंबड येथील शाळेतून तिने शिक्षण घेतलं. करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली. थिएटर आर्ट्स, मुंबई विद्यापीठ येथून तिने पुढील शिक्षण घेतलं. मयत, कमरबंद, सायकल यासारख्या चित्रपटांमध्ये तिने अभिनय केला आहे.8 / 82018 मध्ये मराठी मालिका ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मधून मीनाक्षीने टीव्ही विश्वात पदार्पण केलं. 2020 मध्ये तिला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका मिळाली.