Join us  

Mammootty Net Worth: दाक्षिणात्य कलाविश्वातील अंबानी आहे मामूटी; संपत्तीचा आकडा ऐकून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 6:21 PM

1 / 9
गेल्या काही वर्षांमध्ये दाक्षिणात्य कलाविश्वातील सेलिब्रिटींची लोकप्रियता झपाट्याने वाढली आहे. त्यातलंच एक नाव म्हणजे मामूटी (Mammootty). रजनीकांत, कमल हासन या दिग्गजांच्या यादीत अभिनेता मामूटी यांचं नाव आवर्जुन घेतलं जातं.
2 / 9
जवळपास २५ वर्षांपेक्षा जास्त वर्ष दाक्षिणात्य कलाविश्वात वावर असणाऱ्या मामूटी यांनी ३८० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
3 / 9
मामूटी यांनी तब्बल ९ चित्रपटांमध्ये दुहेरी भूमिका साकारली आहे. त्यामुळे साऊथमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणून ते ओळखले जातात.
4 / 9
तब्बल ३ वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झालेल्या मामूटी यांच्या प्रोफेशनल लाइफसोबतच त्यांची पर्सनल लाइफदेखील चर्चेत असते.
5 / 9
साऊथमधील श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत मामूटी यांचा प्रथम क्रमांक असल्याचं सांगण्यात येतं. त्यामुळे त्यांना साऊथमधील अंबानी असंही म्हटलं जातं.
6 / 9
मामूटी यांची जवळपास २१० कोटींची प्रॉपर्टी असल्याचं सांगण्यात येतं. ते राहत असलेल्या घराची किंमत तब्बल ४ कोटी रुपये आहे.
7 / 9
मामूटी अभिनेता असण्यासोबतच एक निर्मातादेखील आहेत. तसंच ते अनेक ब्रँण्डचे सदिच्छादूतदेखील आहेत.
8 / 9
मामूटी यांचं मेगाबाइट्स हे प्रोडक्शन हाऊस आहे.
9 / 9
मामूटी यांना कार कलेक्शनची विशेष आवड असून त्यांच्याकडे 369 गाड्यांचं कलेक्शन आहेत. या गाड्यांसाठी त्यांनी घरात स्वतंत्र गॅरेज आणि कार पार्किंगची सोय केली आहे.
टॅग्स :ममूटीTollywoodसेलिब्रिटीबॉलिवूड