Join us

साऊथची आघाडीची अभिनेत्री, ४१ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "लग्नाची भीती वाटते कारण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2024 16:51 IST

1 / 7
टीव्ही ते फिल्म इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्या वैयक्तिक आयुष्यात एकट्या आहेत. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही त्या अविवाहित आहेत.
2 / 7
साऊथच्या एका अभिनेत्रीने नुकतंच लग्नाची भीती वाटत असल्याचं वक्तव्य केलं. तिला लग्न करण्याची इच्छाच नाही असंही ती म्हणाली. कोण आहे ती अभिनेत्री?
3 / 7
ही आहे अभिनेत्री त्रिशा कृष्णन (Trisha Krishnan). तिने करिअरमध्ये सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं. साऊथची ती आघाडीची अभिनेत्री बनली. यानंतर तिने अक्षय कुमारच्या 'खट्टा मिठा' मधून बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. यानतंर ती हिंदीत फारशी दिसली नाही पण साऊथमध्ये आजही तिचा डंका आहे.
4 / 7
त्रिशा कृष्णन ४१ वर्षांची आहे. मात्र ती अद्याप अविवाहित आहे. आजकाल नात्यांवर विश्वास ठेवू शकत नाही असं ती म्हणाली. एका मुलाखतीत त्रिशाला लग्नाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा ती म्हणाली, 'मला खरंच माहित नाही मी लग्न कधी करेन. मी ज्याच्यासोबत असेल त्याच्यावरच हे अवलंबून असेल.'
5 / 7
'मी ज्याच्यासोबत अख्खं आयुष्य काढू शकते असा मला कोणी मिळेल तेव्हा मी लग्नाचा विचार करेन. कारण माझा घटस्फोटावर विश्वास नाही. अनेक जोड्या मी अशा पाहिल्या आहेत जिथे त्यांचं एकमेकांशी पटत नाही पण तरी कधी मुलांसाठी किंवा आईवडिलांसाठी टिकवत आहेत. '
6 / 7
'मला असं लग्न अजिबातच नकोय. म्हणूनच मी योग्य व्यक्तीची वाट पाहत आहे. जर असा कोणीच मिळाला नाही तर मी लग्न करणार नाही. कदाचित हेच माझं नशीब असेल.'
7 / 7
त्रिशा नुकतीच 'पोन्नियन सेल्व्हन','लिओ' सिनेमात दिसली. साऊथ इंडस्ट्रीत ती आजही सुपरहिट सिनेमे देत आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीTollywoodलग्न