Join us
Daily Top 2Weekly Top 5

साऊथच्या तीनही सुपरस्टारसोबत गाजलं अफेअर, ४० वर्षीय 'ही' अभिनेत्री एकटीच जगतेय आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 15:04 IST

1 / 9
मनोरंजनविश्वात काम करणाऱ्या कलाकारांचं आयुष्य हे प्रायव्हेट नसतंच. कारण त्यांच्या आयुष्यात काय चाललंय याची उत्सुकता प्रत्येकालाच असते. त्यामुळे अनेकदा कलाकार विचित्र परिस्थितींनाही सामोरे जातात.
2 / 9
तृषा कृष्णन (Trisha Krishnan) ही तमिळ, तेलुगू भाषांमध्ये काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. मात्र तिचं नाव अनेकदा वादांमध्येही अडकलं आहे. तृषासंबंधी असे काही वाद पुढे आले ज्यामुळे तिचं वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यच उद्धवस्त व्हायला आलं.
3 / 9
तृषाने 1999 साली 'जोडी' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. तर 'मौनम पेसियाधे' सिनेमात अभिनेता सूर्या सोबत ती पहिल्यांदा मुख्य भूमिकेत दिसली. 2003 साली आलेल्या विक्रमच्या 'सामी' सिनेमाने तिचं नशीबच बदललं. तिने 'घिस्सी' आणि 'आरु' हे ब्लॉकबस्टर हिट दिले.
4 / 9
तृषाचं फिल्मी करिअर चांगलं सुरु असतानाच वैयक्तिक आयुष्यात मात्र ती अनेक वादांमध्ये अडकली. त्यापैकी एक म्हणजे 'बाहुबली' फेम राणा दगुबत्तीसोबत तिचं अफेअर. राणाने एका कार्यक्रमात तृषासोबतचं नातं स्वीकारलंही होतं
5 / 9
तृषाने मात्र कधीच त्यांचं नातं स्वीकारलं नव्हतं. मग अचानक एक दिवस तृषा आणि राणा यांचे काही इंटिमेट फोटो लीक झाले आणि यामुळे आगीत तेल ओतलं गेलं.
6 / 9
तृषा आणि साऊथ सुपरस्टार धनुष यांचंही अफेअर चर्चेत होतं. त्यांचा बेडरुममधला एक फोटो व्हायरल झाला होता. या अफेअरमुळेच धनुष त्याची पत्नी म्हणजेच रजनीकांत यांची लेक ऐश्वर्यासोबत राहत नाही अशी चर्चा होती.
7 / 9
इतकंच नाही तर तृषाचं नाव साऊथ सुपरस्टार थलपति विजयसोबतही जोडलं गेलं होतं. विजयच्या नादातच तृषाने तिचा वरुण मणियनसोबत झालेला साखरपुडा मोडला होता अशी चर्चा होती.
8 / 9
आता सध्या तृषा तिच्यावर होणाऱ्या आक्षेपार्ह कमेंट्समुळे चर्चेत आहे. आधी अभिनेता मन्सूर खानने तिच्यावर अश्लील कमेंट केली होती. तृषासोबत सिनेमात बेडरुम सीन करायचा होता जसा तिने आधीच्या सिनेमांमध्ये केला आहे असं वक्तव्य मन्सूर खान यांनी केलं ज्यामुळे विवाद झाला होता.
9 / 9
तर नुकतंच आता AIADMK चे माजी नेते ए व्ही राजू यांनीही तृषावर आक्षेपार्ह टिप्पणी केली. तृषाला आमदाराने रिसॉर्टवर बोलावले होते आणि तिला यासाठी मोठी रक्कमही मिळाली असं ते म्हणाले. तृषाने त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई सुरु केली आहे.
टॅग्स :Tollywoodराणा दग्गुबतीधनुषसिनेमारिलेशनशिप