Join us
Daily Top 2Weekly Top 5

विजय देवरकोंडाशी फेब्रुवारीत खरंच लग्न करणार रश्मिका? स्वत:च दिलं उत्तर; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 17:38 IST

1 / 8
विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना हे दाक्षिणात्य सिनेसृष्टीतलं पॉवर कपल आहे. गेल्या काही वर्षांपासून दोघं एकमेकांना डेट करत आहेत.
2 / 8
विजय आणि रश्मिकाने 'डिअर कॉम्रेड' आणि 'गीता गोविंदम' या दोन सिनेमांमध्ये एकत्र काम केलं होतं. 'गीता गोविंदम'नंतरच रश्मिका नॅशनल क्रश बनली होती. नंतर 'पुष्पा'मध्ये श्रीवल्ली भूमिकेने तिला आणखी प्रसिद्धी दिली.
3 / 8
रश्मिका आणि विजयच्या अफेअरच्या चर्चा थांबून आता त्यांच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. २६ फेब्रुवारी रोजी दोघंही उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे.
4 / 8
नुकतंच दोघांनी इटलीतील रोमँटिक शहर रोम येथे नवीन वर्षाचं स्वागत केलं. त्यांच्यासोबत त्यांचा मित्रपरिवारही होता. मात्र विजयने पहिल्यांदाच रश्मिकाची झलक दिसणारे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.
5 / 8
इतकंच नाही तर विजय आणि रश्मिका इतर वेळी वेगवेगळे विमानतळावर दिसतात. पण यावेळी रोमवरुन येताना दोघं एकत्रच आले. यावरुन त्यांच्या लग्नाची बातमी जवळपास कन्फर्मच झाली.
6 / 8
दरम्यान नुकतंच एका दाक्षिणात्य चॅनलला दिलेल्या मुलाखतीत रश्मिकाला फेब्रुवारीतील लग्नाच्या चर्चांवर थेट प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तिनेही सरळ उत्तर दिलं.
7 / 8
रश्मिका मंदाना म्हणाली, 'या अफवा गेल्या चार वर्षांपासून सुरु आहेत, बरोबर ना? आणि लोक अजूनही हाच प्रश्न विचारत आहेत. ते याचीच वाट पाहत आहेत.
8 / 8
'आज मी सांगते की योग्य वेळ असेल तेव्हाच मी याबद्दल बोलेन. मी यावर आता ऑफ कॅमेरा चर्चा करेन, पण कॅमेऱ्यासमोर नाही.'
टॅग्स :रश्मिका मंदानाबॉलिवूडTollywoodविजय देवरकोंडालग्न