Join us
Daily Top 2Weekly Top 5

देशाचं कर्तव्य अन् अभिनयाची आवड! कोण आहे तो IPS अधिकारी जो आज गाजवतोय सिनेसृष्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 17:30 IST

1 / 7
आयपीएस (IPS) अधिकारी होणे हे अनेकांचे स्वप्न असते, पण हे पद मिळवल्यानंतर आपल्या अभिनयाच्या आवडीला जोपासणे अत्यंत कठीण असते. पण एका अधिकाऱ्याने हे करुन दाखवले.
2 / 7
छत्तीसगड कॅडरचे २०१२ बॅचचे आयपीएस अधिकारी शशी मोहन सिंह यांनी मात्र हे करून दाखवले आहे. पोलीस दलातील कर्तव्य पार पाडतानाच त्यांनी अनेक चित्रपट आणि नाटकांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
3 / 7
बिहारच्या एका छोट्या गावातून आलेल्या शशी मोहन सिंह यांना पाचवीत असल्यापासूनच अभिनयाची आवड होती. शाळेतील नाटकात मिळालेल्या कौतुकामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.
4 / 7
पुढे शशी सिंह यांनी विविध थिएटर ग्रुप्समध्ये काम केले आणि अनेक कविताही लिहिल्या. मात्र, कौटुंबिक जबाबदारी आणि करिअरसाठी त्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि त्यांची आयपीएस म्हणून निवड झाली.
5 / 7
पोलीस सेवेत असतानाही त्यांच्यातील कलाकार जिवंत होता. मित्रांच्या आग्रहास्तव त्यांनी 'माया' या छत्तीसगड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले, जो प्रचंड गाजला.
6 / 7
'वर्दी वाला गुंडा' या भोजपुरी चित्रपटात त्यांनी सुपरस्टार दिनेश लाल यादव ऊर्फ 'निरहुआ' सोबत महत्त्वाची भूमिका साकारली आहे. 'मया देदे मयारु', 'माटी के लाल', 'सलाम छत्तीसगड' हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत.
7 / 7
एक पोलीस अधिकारी असूनही चित्रपटात काम केल्यामुळे सुरुवातीला त्यांना लोकांच्या टीकेचा सामना करावा लागला. मात्र, त्यांनी आपल्या कलेचा उपयोग समाजाच्या कल्याणासाठी करण्यास सुरुवात केली. सध्या ते जशपूरचे एसपी (SP) म्हणून कार्यरत असून ड्रग्जचे व्यसन, सायबर क्राईम यांसारख्या विषयांवर पथनाट्ये तयार करून जनजागृती करत आहेत.
टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूडटिव्ही कलाकार