Join us

फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 16:10 IST

1 / 10
दक्षिणेतील गुणी अभिनेता फहाद फासिल (Fahadh Faasil) आपल्या ताकदीच्या अभिनयामुळे केवळ मल्याळमच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत आपली वेगळी छाप सोडतो आहे.
2 / 10
'पुष्पा'मधील 'भंवर सिंह शेखावत' या भुमिकेतून फहाद फासिलनं आपली छाप सोडली. आजवर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारत त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
3 / 10
फहादचा चाहतावर्ग फार मोठा आहे. त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक असतात. अलिकडेच द हॉलीवूड रिपोर्टर इंडियाला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत फहादनं त्याच्या आवडत्या पाच चित्रपटांची यादी शेअर केली आहे.
4 / 10
त्याचा पहिला आवडता चित्रपट आहे 'मिली' (Mili). हा १९७५ चा ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित भारतीय हिंदी भाषेतील रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. यात अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि अशोक कुमार यांच्या भूमिका आहेत. आयएमडीबीवर या चित्रपटाला ७.४ रेटींग मिळालेलं आहे.
5 / 10
फहादचा दुसरा आवडता चित्रपट 'जॉनी' (Johnny) हा आहे. १९८०चा भारतीय तमिळ-भाषेतील क्राईम थ्रिलर चित्रपट आहे. जो महेंद्रन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात रजनीकांत, श्रीदेवी आणि दीपा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.७ रेटींग मिळालेलं आहे.
6 / 10
'सीझन' (Season) हा चित्रपट फहादचा आवडता आहे. १९८९ चा भारतीय मल्याळम-भाषेतील ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. जो पद्मराजन यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. यात मोहनलाल आणि गॅविन पॅकार्ड यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ही कथा केरळमधील कोवलम बीच आणि पूजापुरा सेंट्रल जेल, तिरुवनंतपुरम येथे बेतलेली आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.६ रेटींग मिळालेलं आहे.
7 / 10
२००० साली प्रदर्शित झालेला 'मलेना' (Malena) हा ऐतिहासिक रोमँटिक ड्रामा चित्रपट फहादचा आवडता आहे. जो लुसियानो व्हिन्सेंझोनीच्या कथेवरून ज्युसेप्पे टोर्नाटोर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे. यात मोनिका बेलुची आणि ज्युसेप्पे सल्फारो यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.४ रेटींग मिळालेलं आहे.
8 / 10
फहादचा पाचवा आवडता चित्रपट म्हणजे 'इल पोस्टिनो: द पोस्टमन' (Il Postino: The Postman). हा १९९४ चा कॉमेडी-नाटक चित्रपट आहे. जो मॅसिमो ट्रॉईसी यांनी लिहिलेला आणि अभिनीत आहे. तर इंग्रजी चित्रपट निर्माते मायकेल रॅडफोर्ड दिग्दर्शित आहे. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.८ रेटींग मिळालेलं आहे.
9 / 10
दरम्यान, आज फहादचा 'मारेसन' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. ही फिल्म दोन अशा व्यक्तींविषयी आहे, जे स्वतःच्या महत्त्वाकांक्षां आणि आदर्शांनुसार आयुष्याच्या प्रवासावर निघालेले असतात. एक व्यक्ती, जो अल्झायमरचा रुग्ण आहे, एका महत्त्वाच्या मिशनसाठी स्वतःच्या घरातून पळून जातो आणि त्या मिशनची पूर्तता करण्यासाठी आपले प्राण पणाला लावतो. दुसरा व्यक्ती मात्र स्वतःचं आयुष्य सुधारण्यासाठी त्या अल्झायमरच्या रुग्णाची फसवणूक करून त्याचे पैसे चोरण्याचा प्रयत्न करतो.
10 / 10
फहाद फासिलच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाल्यास तो 'द इडियट ऑफ इस्तांबुल' (The Idiot of Istanbul) या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा इम्तियाज अली यांचा चित्रपट आहे.
टॅग्स :सेलिब्रिटीसिनेमाअमिताभ बच्चनजया बच्चन