फहाद फासिल आणि साई पल्लवीचा 'हा' थ्रिलर चित्रपट OTTवर प्रदर्शित, क्लायमॅक्स हादरवणारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 16:07 IST
1 / 9दाक्षिणात्य सिनेविश्वात विविधांगी अभिनयाची छाप सोडणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे फहाद फासिल (Fahadh Faasil). 2 / 9'पुष्पा' आणि 'पुष्पा २: द रूल' या चित्रपटात 'भंवर सिंह शेखावत' या धाकड भुमिकेनंतर फहाद फासिलची प्रचंड क्रेझ भारतात निर्माण झाली. 3 / 9फहाद फासिलने त्याच्या कित्येक सिनेमामध्ये दर्जेदार काम केलंय. आता पुन्हा एकदा तो चर्चेत आला आहे.4 / 9विशेष म्हणजे फहादसोबत या सिनेमात दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी आहे.5 / 9 २०१९ थिएटरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. 6 / 9 या चित्रपटाचं नाव 'अथिरन' (Athiran) असं आहे. ओटीटीवर येताच हा चित्रपट खूप लोकांनी पाहिला आहे.7 / 9 'अथिरन' हा डिज्नी प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे. सध्या तो ट्रेंड करतोय. 8 / 9भूतकाळातल्या घटनांमध्ये अडकलेल्या आणि उपचारासाठी एका रुग्णालयात डांबून ठेवलेल्या नित्याच्या सुटकेचा मनोरंजक थरार या चित्रपटात पाहायला मिळतो.9 / 9साई पल्लवीसारखी दर्जेदार अभिनेत्री आणि फहाद फासिलसारखा अष्टपैलू अभिनेता एकत्र आल्यावर काय होतं, हे सिनेमा पाहिल्यावर तुम्हाला कळेलचं.