UPSC परीक्षेत पास होऊन अभिनेत्री IAS झाली; ३२ सिनेमांमध्ये काम करुन सिनेसृष्टीला ठोकला रामराम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 12:04 IST
1 / 7सिनेसृष्टीच्या झगमगाटाची एकदा सवय लागली की, ही इंडस्ट्री सोडून जावंसं वाटत नाही. पण मनोरंजन विश्वातील अशीच एक अभिनेत्री आहे जिने सिनेसृष्टी सोडून देशसेवेचा मार्ग निवडला2 / 7या अभिनेत्रीचं नाव आहे एच. एस. कीर्तना (HS Keerthana). तब्बल ३२ चित्रपटांत काम केल्यानंतर कीर्तनाने अभिनयाला रामराम ठोकला.3 / 7कीर्तनाने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. 'कर्पूरदा गोम्बे', 'गंगा-यमुना', 'उपेंद्र', 'हब्बा' आणि 'लेडी कमिशनर' यांसारख्या ३२ सुपरहिट कन्नड चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे.4 / 7मोठ्या पडद्यावर यश मिळवत असतानाच तिच्या मनात देशसेवेचे स्वप्न आकार घेत होते. वडिलांची इच्छा आणि स्वतःची जिद्द यामुळे कीर्तनाने २०११ मध्ये 'कर्नाटक प्रशासकीय सेवा' (KAS) परीक्षा उत्तीर्ण केली.5 / 7दोन वर्षे कीर्तनाने अधिकारी म्हणून काम केले, ज्यामुळे तिला प्रशासकीय कामाचा अनुभव मिळाला. मात्र, तिचे मुख्य ध्येय IAS अधिकारी बनणे हेच होते. त्यामुळे कीर्तना IAS ची तयारी करत होती.6 / 7IAS बनण्याच्या प्रवासात कीर्तनाला सलग पाचवेळा अपयशाचा सामना करावा लागला. पण कीर्तनाने आपला संयम सुटू दिला नाही. अखेर सहाव्या प्रयत्नात, २०२० मध्ये तिने UPSC परीक्षेत १६७ वा रँक मिळवला आणि तिची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाली.7 / 7IAS अधिकारी बनल्यानंतर कीर्तना सध्या चिक्कमगलुरु येथील जिल्हा पंचायतीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून आपली जबाबदारी पार पाडत आहे. अशाप्रकारे अभिनेत्री कीर्तनाची ही कहाणी सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.