Join us
Daily Top 2Weekly Top 5

७४ वर्षीय ज्येष्ठ अभिनेत्याकडे गाड्यांचं लक्झरी कलेक्शन! प्रत्येकीचा नंबर आहे ३६९; काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 11:19 IST

1 / 7
७४ वर्षीय सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता. ज्याला आहे गाड्यांची आवड आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्याच्या प्रत्येक गाड्यांचा नंबर ३६९ असा आहे. कोण आहे हा अभिनेता? काय आहे यामागचं कारण.
2 / 7
ही रंजक गोष्ट आहे अभिनेते मामूटी यांच्याबद्दल. मामूटी यांना गाड्यांचं प्रचंड वेड असून त्यांच्या ताफ्यात अनेक गाड्या आहेत. विशेष म्हणजे मामूटी यांच्या प्रत्येक गाडीचा नंबर ३६९ असा आहे.
3 / 7
असं सांगण्यात येतं की, मामूटी यांनी करिअरच्या सुरुवातीला एक ब्रीफकेस खरेदी केली होती. त्या ब्रीफकेसचा कोड ३६९ असा होता. त्यांना हा नंबर प्रचंड आवडला. कारण ३ चा गुणाकार म्हणून हा नंबर त्यांना आकर्षित करत होता.
4 / 7
त्यामुळे जेव्हा मामूटी करिअरमध्ये यशस्वी होऊन त्यांनी गाड्या खरेदी करायला सुरुवात केली. तेव्हा त्यांनी गाड्यांचा नंबर ३६९ हा घ्यायला सुरुवात केली. पुढेही प्रत्येक गाडीचा नंबर त्यांनी हाच ठेवला.
5 / 7
टोयोटा फॉर्च्यूनर, मिनी कूपर एस, जगुआर एक्सजे, टोयोटा लँड क्रूजर, ऑडी ए 7, बीएमडब्ल्यू ई 46 एम3, मित्सुबिशी पजेरो स्पोर्ट अशा गाड्या मामूटी यांच्याकडे आहेत. या सर्व गाड्या ३६९ नंबरने रजिस्टर आहेत.
6 / 7
मामूटी यांच्या या कार प्रेमामुळे त्यांच्या कार कलेक्शनला चाहत्यांमध्ये '३६९ गॅरेज' म्हणून ओळखले जाते. केवळ मामूटीच नाही, तर त्यांचा मुलगा आणि अभिनेता डुलकिर सलमान यालाही गाड्यांची प्रचंड आवड आहे.
7 / 7
मामूटी हे वयाचे ७० वर्ष ओलांडली तरीही सिनेसृष्टीत सक्रीय आहेत. त्यांच्या आगामी पॅट्रियोट, पदयात्रा या सिनेमांची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. मामूटी यांच्या गाड्यांच्या नंबरमागची ही कहाणी ऐकून सर्वजण थक्क झाले आहेत.
टॅग्स :ममूटीबॉलिवूडTollywood