Join us

सौंदर्याच्या बाबतीत साऊथच्या या अभिनेत्रींच्या आई देतायेत आपल्याच मुलींना टक्कर; फोटो पाहून तुम्हीही ठेवाल विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2022 16:03 IST

1 / 12
साऊथ फिल्म इंडस्ट्रीने सध्या चांगलाच धमाका केला आहे. साऊथमधील कितीतरी सिनेमे शेकडो कोटी रूपयांची कमाई करत आहेत. हिंदी सिनेमाचा मोठा प्रेक्षकवर्ग हे सिनेमे बघू लागला आहे. इतकंच नाही तर साऊथमधील सेलिब्रिटींची क्रेझही जगभरात वाढत आहे. अभिनेत्यांसोबतच साऊथच्या अभिनेत्रीही मोठ्या प्रमाणात जगभरात लोकप्रिय आहेत. साऊथच्या अनेक अभिनेत्रींबाबत तुम्हाला माहीत असेल, पण त्यांच्या मातांबाबत फार कमी लोकांना माहीत असेल. त्यामुळे आम्ही साऊथमधील अभिनेत्रींच्या मातांबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (All Image Credit : Bollywood Shaadi))
2 / 12
श्रिया सरन - श्रिया सरन साऊथमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिच्या सौंदर्याची एक झलक बघण्यासाठी फॅन्स आतुर असतात. ती नुकतीच छोट्या भूमिकेत RRR सिनेमातही दिसून आली. श्रिया सरनच्या आईचं नाव आहे नीरजा सरन. त्या एक रिटायर्ड केमिस्ट्री शिक्षिका आहेत. श्रिया नेहमीच आईसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
3 / 12
श्रुति हसन - केवळ साऊथमधीलच नाही तर हिंदी सिनेमातही काम करणारी लोकप्रिय अभिनेत्री श्रुति हसनची आई प्रसिद्ध अभिनेत्री सारिका आहे. सारिका यांनी चाइल्ड आर्टिस्ट म्हणून इंडस्ट्रीत काम सुरू केलं होतं. त्यांनी अनेक हिंदी सिनेमात काम केलं. त्यांना श्रुति सोबतच आणखी एक मुलगी आहे अक्षरा हसन.
4 / 12
काजल अग्रवाल - काजलने हिंदी इंडस्ट्रीत २००४ साली पाऊल ठेवलं होतं. त्यानंतर ती साऊथकडे गेली. आज ती साऊथमधील टॉपची अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट सिनेमात तिने काम केलं. काजलच्या आईचं नाव आहे सुमन अग्रवाल. काजलप्रमाणेच तिची आई सुद्धा क्यूट आहे. त्या मुंबईत एक कन्फेक्शनर आहेत.
5 / 12
अनुष्का शेट्टी - अनुष्का शेट्टीचं खरं नाव स्वीटी शेट्टी आहे. साऊथमध्ये तिने अनेक सुपरहिट सिनेमे दिले आहेत. त्यानंतर बाहुबलीमधून ती जगभरात फेमस झाली. अनुष्काच्या आईचं नाव आहे प्रफुल्ल शेट्टी. तिच्या करिअरमध्ये तिच्या आईचं खूप मोठं योगदान आहे.
6 / 12
तमन्ना भाटिया - तमन्ना भाटियाला कोणत्याही वेगळ्या परिचयाची गरज नाही. काही हिंदी आणि अनेक साऊथ सिनेमे तिने केले. ती आज साऊथमधील टॉपची अभिनेत्री आहे. तिच्या आईचं नाव आहे रजनी भाटिया. दोघीही सुंदर दिसतात.
7 / 12
तृषा कृष्णन - तृषा प्रामुख्याने तमिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेमात दिसते. मिस चेन्नई किताब जिंकल्यानंतर ती अभिनय क्षेत्रात आली होती. तिच्या आईचं नाव उमा कृष्णन आहे. ती तिच्या आईला तिची आयडल मानते
8 / 12
जेनेलिया डिसूज़ा - आपली सर्वांची लाडकी चुलबुली जेनेलिया बऱ्याच हिंदी आणि साऊथमधील सिनेमात दिसली. अनेक जाहिरातीत ती दिसते. जेनेलियाच्या आईचं नाव आहे जेनेट डिसूजा. आधी त्या एका फार्मा कंपनीत मॅनेजिंग डायरेक्टर होत्या. त्यानंतर जेनेलियाला करिअरमध्ये मदत करण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली. सध्या त्या बिझनेस करतात.
9 / 12
तापसी पन्नू - तापसीने एका तेलुगू सिनेमातून २०१० मध्ये डेब्यू केलं होतं. आज ती हिंदीत एकापेक्षा एक सिनेमे करत आहे. तापसीच्या आईचं नाव निर्मलजीत आहे. तापसीने आईसोबतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
10 / 12
इलियाना डी क्रूज़ - इलियानाने अनेक तेलुगू सिनेमे केले. तिची आई समीरा एक हॉटेल मॅनेजर आहे. तिच्या आईमुळेच ती मॉडलिंग क्षेत्रात आली आणि नंतर स्टार बनली. दोघीही जवळपास सारख्या दिसतात.
11 / 12
रश्मिका मंदाना - नॅशनल क्रश म्हणून लोकप्रिय असलेली रश्मीका मंदाना आता 'पुष्पा' आणखीनच लोकप्रिय झाली आहे. ती तिच्या खास स्माइलसाठी ओळखली जाते. तिच्या आईचं नाव सुमन मंदाना आहे.
12 / 12
सामंथा रुथ प्रभु - तमिळ आणि तेलुगू सिनेमांची लोकप्रिय अभिनेत्री सामंथाने अनेक सुपरहिट सिनेमे दिले. पुष्पातील आयटम नंबरने तर ती जगभरात लोकप्रिय झाली. अनेक अवॉर्ड्स तिने तिच्या नावावर केले आहेत. तिच्या आईचं नाव निनेट प्रभु आहे. (Image Credit : pinterest.com)
टॅग्स :बॉलिवूडTollywoodसेलिब्रिटीरश्मिका मंदानासमांथा अक्कीनेनी