Join us

अमेरिकेत झाला जन्म, साऊथची ब्युटी क्वीन 'पुष्पा २' मध्ये करणार आयटम साँग!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 15:49 IST

1 / 7
अल्लू अर्जुनच्या आगामी बहुप्रतिक्षित 'पुष्पा २' सिनेमाची जोरदार चर्चा आहे. पहिला भाग तुफान गाजल्यानंतर आता सिनेमाचा सीक्वेल येत आहे. 'पुष्पा' मध्ये समांथाचं 'ऊ अंटावा' आयटम साँग गाजलं होतं.
2 / 7
आता 'पुष्पा २' मध्येही आयटम साँग असणार आहे. पण समांथाच्या जागी साऊथ अभिनेत्री श्रीलीलाची (Sreeleela) यासाठी निवड झाली आहे. नक्की कोण आहे श्रीलीला?
3 / 7
श्रीलीला साऊथची ब्युटी क्वीन म्हणून ओळखली जाते. श्रीलीलाचा जन्म अमेरिकेत झाला. तर बंगळुरुत ती लहानाची मोठी झाली. तिची आई स्वर्णलता या बंगळुरुतील प्रसिद्ध गायनॉकॉलॉजिस्ट आहेत. त्यांनी बिझनेसमन सुरापनेनी शुभाकर राव यांच्यासोबत लग्न केले. काही वर्षातच त्यांचा घटस्फोट झाला. श्रीलीलाचा जन्म त्यांच्या घटस्फोटानंतर झाला.
4 / 7
श्रीलीलाला तिच्या आईसारखंच डॉक्टर बनायचं होतं. 2021 मध्ये ती एमबीबीएस झाली. फेब्रुवारी २०२२ मध्ये तिने दोन दोन दिव्यांग मुलांना दत्तक घेतले. डॉक्टर होऊनही तिची ओढ नृत्य आणि अभिनयाकडेच होती.
5 / 7
श्रीलीलाने बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. २०१७ मध्ये तिने 'चित्रांगदा' सिनेमात चाईल़्ड आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं. तर 'किस' सिनेमात तिने पहिल्यांदा मुख्य भूमिका साकारली. यातील तिच्या कामाचं खूप कौतुक झालं. यानंतर तिने अनेक कन्नड, तेलुगु सिनेमांमध्ये काम केलं.
6 / 7
यावर्षी श्रीलीलाने महेश बाबू सोबतही काम केलं आहे. 'गुंतूर कारम' सिनेमात दोघांनी स्क्रीन शेअर केली आहे. हा सिनेमा बॉक्सऑफिसवर फारसा चालला नाहीय
7 / 7
आता तिला अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. श्रीलीलाच्या आयटम साँगची झलकही समोर आली आहे.
टॅग्स :अल्लू अर्जुनTollywoodसेलिब्रिटी